Dhule Lok Sabha Election: शोभा बच्छाव यांच्या विजयाची मदार कुणाल पाटलांवरच

MLA Kunal Patil News: आमदार कुणाल पाटील धुळे ग्रामीण मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात. मात्र गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने या मतदारसंघात आघाडी घेतली. अगदी कुणाल पाटील यांच्या गावातही मतांच्या संख्येत भाजपने काँग्रेसला मागे टाकले होते.
Dhule Lok Sabha Election Voting news
Dhule Lok Sabha Election Voting newsSarkarnama

MLA Kunal Patil News: धुळे लोकसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी आमदार कुणाल पाटील हे काँग्रेस पक्षाची पहिली पसंती होती. मात्र त्यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला. त्यामुळे माजी राज्यमंत्री डॉ.शोभा बच्छाव (Shobha Bachhao) यांना उमेदवारी देण्यात आली.

धुळे लोकसभा मतदार संघात काँग्रेसच्या (Dhule Lok Sabha Election Voting news) उमेदवार डॉ. बच्छाव यांच्या प्रचाराची सर्व सूत्रे आमदार पाटील यांच्याकडे होती. त्यांनी डॅमेज कंट्रोल करण्यात यश मिळवले. शेवटच्या टप्प्यात काँग्रेसने प्रचारात चांगली आघाडी देखील घेतली. या सर्व घडामोडी धुळे मतदार संघात ५५.९६ टक्के मतदान झाले. यामध्ये धुळे ग्रामीण मतदार संघात ५७.३१ टक्के मतदान झाले आहे. मतदारांचा कौल कोणाला मिळतो, हे चार जूनला समजेल.

आमदार कुणाल पाटील (MLA Kunal Patil)धुळे ग्रामीण मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात. मात्र गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने या मतदारसंघात आघाडी घेतली. अगदी कुणाल पाटील यांच्या गावातही मतांच्या संख्येत भाजपने काँग्रेसला मागे टाकले होते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकात काय होते? यावर धुळे लोकसभेच्या निकालाचे भवितव्य अवलंबून आहे.

Dhule Lok Sabha Election Voting news
BJP Politics: ना प्रचारात सहभाग, ना मतदान केलं; भाजपकडून माजी केंद्रीय मंत्र्याला नोटीस

धुळे ग्रामीण मतदार संघात १०८ गावांमध्ये अतिशय शांततेत मतदान झाले. धुळ्यात प्रचंड उकाडा आहे. तापमान ४३ अंशावर गेले आहे. अशा स्थितीतही मतदारांनी मतदान केंद्रांवर रांगा लावलेल्या दिसल्या. ५७.३१ टक्के मतदान झाल्याने हे मतदान कोणाच्या बाजूला झुकते यावर निकाल करणार आहे. त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवाराला या मतदानाचा कल जाणून घेण्याची मोठी उत्सुकता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यंदाची निवडणूक लोकसभेची आहे मात्र त्यावर शेतकरी आणि अन्य प्रश्नांचा मोठा प्रभाव निर्माण झालेला दिसला. भाजप उमेदवार डॉ. भामरे यांच्या विरोधात अँटी इन्कमबन्सी असल्याचीही चर्चा होती. त्यामुळे आमदार कुणाल पाटील यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. अवघ्या काही महिन्यातच आमदार पाटील यांना विधानसभा निवडणुकीला सामोरे जायचे आहे. त्यामुळे एक प्रकारे ही त्यांची परीक्षाच आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठी आघाडी मिळाल्यास आमदार पाटील यांना विधानसभा निवडणूक सोपी जाऊ शकते. त्यामुळे आमदार पाटील यांनी देखील लोकसभा मतदानासाठी चांगला जोर लावला होता. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शरद पाटील आणि अन्य सहकार यांनीही त्यांना चांगली मदत केली. त्यामुळे यंदा धुळे ग्रामीण मतदार संघ काँग्रेसला साथ देईल का याची उत्सुकता आहे.

Edited by: Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com