BJP Politics: ना प्रचारात सहभाग, ना मतदान केलं; भाजपकडून माजी केंद्रीय मंत्र्याला नोटीस

lok sabha election 2024: निवडणूक प्रचारास सहभाग घेतला नाही, संघनात्मक कामातही सहभागी झाले नाही, मतदानही केले नाही, या पार्श्वभूमीवर भाजपने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. दोन दिवसात उत्तर देण्याचे आदेश दिले आहे.
 Jayant Sinha
Jayant SinhaSarkarnama
Published on
Updated on

Hazaribagh News, 21 May: लोकसभेच्या पाचव्या टप्यातील मतदान झाल्यानंतर भाजपने प्रचारापासून अलिप्त राहणाऱ्या नेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. माजी केंद्रीयमंत्री जयंत सिन्हा यांना (Jayant Sinha) भाजपने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

झारखंडमधील हजारीबाग लोकसभा मतदारसंघातून (Hazaribagh Lok Sabha 2024) दोन वेळी खासदार राहिलेले जयंत सिन्हा यांना या निवडणुकीत पक्षाने तिकीट कापले होते. त्याऐवजी मनीष जयस्वाल यांनी उमेदवारी देण्यात आली होती.

जयस्वाल यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जयंत सिन्हा हे निवडणूक प्रचारापासून अलिप्त होते. या कारणावरुन त्यांना पक्षाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. जयंत सिन्हा यांनी यांचे वडील माजी खासदार यशवंत सिन्हा आणि आई नीलिमा सिन्हा यांनी मतदान केले. पण जयंत सिन्हा यांनी मतदान केले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

 Jayant Sinha
Pune Porsche Accident : दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन मुलाच्या वडिलांच्या मुसक्या आवळल्या...

निवडणूक प्रचारात सहभाग घेतला नाही, संघनात्मक कामातही सहभागी झाले नाही, मतदानही केले नाही, या पार्श्वभूमीवर भाजपने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. दोन दिवसात उत्तर देण्याचे आदेश दिले आहे.

"लोकसभा निवडणूक 2024 मध्ये हजारीबाग लोकसभा मतदारसंघातून पक्षाने मनीष जयस्वाल यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तुम्ही त्यांच्या प्रचारात सहभाग घेतला नाही, लोकशाहीच्या या मोठ्या उत्साहात सहभाग घेतला नाही. मतदानाचा हक्क बजावला नाही, तुमच्या या कृतीमुळे पक्षाची प्रतिमा मलीन झाली आहे," असे पक्षाने त्यांना पाठवलेल्या नोटीसमध्ये म्हटलं आहे.

प्रदेशाध्यक्ष बाबूलाल मरांडी यांच्या सूचनेनंतर सिन्हा यांना नोटीस बजावण्यात आली आहे. जयंत सिन्हा काही महिन्यापासून राजकारणापासून अलिप्त होते. जयस्वाल यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ते त्यांना भेटायला गेले होते. विक्रमी मतांनी तुमचा विजय होईल, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या होत्या.

सक्रिय राजकारणातून निवृत्त होत असल्याची घोषणा त्यांनी केली होती. त्यांचे तिकीट कापण्यापूर्वीच त्यांनी निवडणूक लढविणार नसल्याचे म्हटले होते. त्यांचे पुत्र आशिर सिन्हा यांनी काही दिवसापूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तर जयंत सिन्हा यांचे वडील यशवंत सिन्हा यांनी 2018 मध्ये भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

 Jayant Sinha
Maharashtra Lok Sabha Election 2024 Voting LIVE : देशात 5 वाजेपर्यंत 54.68 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक तर महाराष्ट्रत सर्वात कमी मतदान

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com