Dhule Crime: धक्कादायक; गोळीबार करीत पाच मिनिटात लुटले साडेतीन किलो सोने!

Three and a half kilos of gold looted in five minutes: धुळे शहरात सराफी व्यावसायिकांवर पाळत ठेवून घातला दरोडा, शहरात घबराट.
Gold Robbery at Dhule
Gold Robbery at DhuleSarkarnama
Published on
Updated on

Dhule Gold Robbery: गेल्याच आठवड्यात जळगाव जिल्ह्यातील सत्ताधारी माजी आमदाराने गावठी बंदुकांचा सुळसुळाट झाल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी पोलीस गांभीर्याने कारवाई करीत नसल्याचे देखील या नेत्याने सांगितले होते. याच पार्श्वभूमीवर धुळ्यामध्ये धक्कादायक दरोड्याची घटना घडली आहे.

धुळे शहरात सोन्याच्या दागिन्यांचे वितरण करणाऱ्या दोन व्यापाऱ्यांवर गोळीबार करीत गुन्हेगारांनी दरोडा टाकला. या व्यापाऱ्यांकडील साडेतीन किलो सोने असलेली बॅग दरोडेखोरांनी हवेत गोळीबार करीत पळवून नेली. उद्या पाच मिनिटात घडलेल्या या सिनेस्टाईल दरोड्याने धुळे शहर हादरले आहे.

गेल्याच आठवड्यात भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार दिलीप ओंकार वाघ यांनी गावठी बंदुकांचा सुळसुळाट झाल्याची तक्रार केली होती. धुळे शहरातील माजी आमदार अनिल गोटे यांनीही गुन्हेगारी वाढली आहे. त्याबाबत पोलिसांनी गंभीर उपाययोजना करण्याची मागणी केली होती. राजकीय नेत्यांनी शहरातील कायद्याने सुव्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी सातत्याने होत होती.

Gold Robbery at Dhule
Sunil Bagul: भाजपचा ट्रॅप यशस्वी, शिवसेनेचे बडतर्फ नेते सुनील बागुल यांचा भाजप प्रवेश ठरला!

या पार्श्वभूमीवर अक्कलकुवा आणि तळोदा येथील कामकाजा टपून व्ही. एम. ज्वेलर्स डिस्ट्रीब्युटर्सचे व्यापारी विनय मुकेश जैन आणि किशन मोदी हे बुधवारी रात्री आठला बसने धुळे शहरात आले. पांझरा नदीलगतच्या स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळ्याजवळ रात्री नऊच्या सुमारास वर्दळ असते. यावेळी हे व्यापारी एसटी बस मधून उतरताच मोटरसायकलवर आलेल्या तिघांनी जमिनीवर तसेच हवेत गोळीबार करून दहशत निर्माण केली.

या व्यापाऱ्यांना काही समजण्याच्या आधीच मोटरसायकल वरून आलेल्या दोघांनी त्यांच्या हातातील बॅग हिसकावून घेतली. ते लगेचच मोटरसायकलवर बसले. त्यानंतर तिन्ही दरोडेखोर बिलाडी रोडने महामार्गाकडे भरधाव निघून गेले. ही घटना कळतच मोठा जमाव जमला होता. गोळीबाराच्या घटनेने शहरात घबराट पसरली.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांसह मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी आणि पाऊस फाटा घटनास्थळी दाखल झाला. संबंधित सोने व्यापाऱ्यांची माहिती गुन्हेगारांना कोणीतरी दिली असण्याची दाट शक्यता आहे. त्या आधारे पाळत ठेवून हा दरोडा टाकण्यात आला असावा. सोने व्यापाऱ्यांकडील साडेतीन किलो सुमारे साडेतीन कोटी रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. पोलीस याबाबत गुन्हेगारांचा माघ काढण्यात व्यस्त आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com