Dhule Lok Sabha constituency : भाजपच्या खासदाराला माजी पोलीस अधिकाऱ्याचे आव्हान ; निवडणूक लढविणारच..

Subhash Bhamre Vs Pratap Dighavkar : कोणत्याही परिस्थितीत धुळे मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढविणारच...
Subhash Bhamre,   Pratap Dighavkar
Subhash Bhamre, Pratap DighavkarSarkarnama
Published on
Updated on

Dhule Loksabha News : आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरवात झाली आहे. धुळे (Dhule) लोकसभा मतदारसंघाचे राजकारण तापू लागले आहे. गेले काही दिवस भाजपचे (BJP) खासदार डॉ. सुभाष भामरे (Subhash Bhamre) यांनी मतदारसंघाचे दौरे सुरु केले आहेत.

त्यांना आता निवृत्त पोलीस महासंचालक प्रताप दिघावकर (Pratap Dighavkar) यांचे आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे भाजप विरूद्ध काँग्रेसचा (Congress) सामना रंगण्याची चिन्हे आहेत.

"आगामी लोकसभा निवडणुकीत आपण रिंगणात उतरणार आहोत. कोणत्याही परिस्थितीत धुळे मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढविणारच. कोणत्या पक्षात प्रवेश करून निवडणूक लढवायची, यासंदर्भात कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल," असे नाशिक परिक्षेत्राचे माजी विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

Subhash Bhamre,   Pratap Dighavkar
Sharad Pawar News : अमळनेरला आता भाकरी फिरवण्याची वेळ आलीये ? शरद पवारांच्या दौऱ्यानं..

"सर्वांनाच ‘अच्छे दिन’ येतील," असे सूतोवाचही त्यांनी केले. सद्यःपरिस्थितीत आपण कोणाची तुलना करणार नाही. कोणावर टीका, टिप्पणीही करणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

काही दिवसांपासून दिघावकर यांचे नाव लोकसभा निवडणुकीसाठी घेतले जात आहे. या संदर्भात पत्रकारांनी विचारले असता कोणत्याही परिस्थितीत धुळे मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सध्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी सुरू आहेत. बागलाण ही जन्मभूमी आहे, तर सासरवाडी धुळ्याची आहे. त्यामुळे मातृभूमीतून निवडणूक लढवून जनसेवा करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. कार्यकर्ते व सर्वांशी चर्चा करून पक्षाबाबत निर्णय घेतला जाईल. शेतकरी व बेरोजगारांसाठी काही तरी करायची इच्छा आहे. प्रशासकीय कामाचा मोठा अनुभव आहे.

Subhash Bhamre,   Pratap Dighavkar
Manipur Violence : मणिपूर पेटलंय..काय आहेत मागण्या ? हिंसाचार कशासाठी ? मोदींनी व्यक्त व्हायला हवे..; सविस्तर वाचा

आगामी काळात शाळा, महाविद्यालयांत स्पर्धा परीक्षांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याबरोबरच त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या समस्या आपण जाणून घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून यशस्वी व्हावे, असे आवाहनही दिघावकर यांनी केले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कामकाजातील सुधारणांची सविस्तर माहिती दिघावकर यांनी यावेळी दिली. ते म्हणाले, की आयोगाच्या परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यात आली आहे. एमपीएससी व यूपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी एकच अभ्यासक्रम निश्चित करण्यात आला आहे. विद्यार्थ्याला एकच प्रीलियम द्यावी लागणार आहे. ५४ प्रकारच्या जागांसाठी एकच परीक्षा घेतली जाणार आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com