Dhule Loksabha 2024 : धुळ्यात भाजपच्या मदतीला 'वंचित'चा उमेदवार?

Loksabha Election 2024 : धुळे लोकसभा मतदारसंघात उमेदवारासाठी चाचपडणाऱ्या काँग्रेसच्या अडचणीत वाढ झाली आहे. अजूनही काँग्रेस पक्ष उमेदवाराच्या शोधात चाचपडत आहे. मात्र, अल्पसंख्याक मतांमध्ये विभागणी झाल्याने त्याचा थेट फायदा भाजपच्या उमेदवाराला होईल.
Abdul Rahman
Abdul Rahman Sarkarnama
Published on
Updated on

Congress Politics News: धुळे मतदारसंघात भाजपने डॉक्टर सुभाष भामरे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेस पक्ष उमेदवाराच्या शोधात चाचपडत आहे. अशातच वंचित यांनी अल्पसंख्याक उमेदवार देऊन काँग्रेसच्या अडचणी वाढविल्या आहेत.

प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने अखेर आपला वेगळा डाव खेळलाच. त्यांनी जाहीर केलेल्या अकरा उमेदवारांमध्ये धुळे मतदारसंघासाठी निवृत्त आयपीएस अधिकारी अब्दुल रहमान (Abdul Rahman) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. रहमान यांच्या उमेदवारीमुळे मालेगाव आणि धुळे शहरातील काँग्रेसच्या परंपरागत अल्पसंख्याक मतांना शेज लागणार आहे. अल्पसंख्याक मतांमध्ये विभागणी झाल्याने त्याचा थेट फायदा भाजपच्या उमेदवाराला होईल.

धुळे लोकसभा मतदारसंघात (Dhule Loksabha Constituncy) भाजपचे विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे (Subhash Bhamare) तिसऱ्यांदा मतदारांना सामोरे जात आहेत. डॉ. भामरे यांच्या विरोधात भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांच्या तक्रारी आहेत. त्यांच्या विरोधात नऊ जणांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. इच्छुकांची संख्या मोठी असल्याने पक्षापुढेही अडचणी होत्या. मात्र, अंतिमत: डॉक्टर भामरे यांनाच पुन्हा संधी मिळाली. त्यामुळे भाजपच्या (BJP) इच्छुकांमध्ये नाराजी असल्याने त्यांनी वरिष्ठांशी संपर्क सुरू केला आहे. यातील अनेकांना डॉ. भामरे यांची उमेदवारी बदलू शकते, असा विश्वास आहे. डॉ. भामरे यांच्याबाबत अँटी इन्कमबन्सी असल्याच्या तक्रारी आहेत. मात्र, प्रतिस्पर्धी काँग्रेस पक्ष त्याचा फायदा घेण्यात कितपत यशस्वी होईल, हे सांगता येत नाही.

Abdul Rahman
Dispute In Mahayuti : नाशिकमध्ये छगन भुजबळांची उमेदवारी निश्चित; खासदार हेमंत गोडसे बंडखोरीच्या तयारीत?

धुळे मतदारसंघात गेल्या दोन महिन्यांपासून काँग्रेसचा उमेदवारासाठी शोध सुरू आहे. त्यासाठी पक्षाची लोकसभा निवडणुकीच्या तयारीची बैठकदेखील धुळे येथे झाली. मात्र, धुळ्याचे जिल्हा अध्यक्ष शाम सनेर आणि नाशिकचे डॉ. तुषार शेवाळे (Tushar Shelke) यापलीकडे तिसरा उमेदवार पक्षाला सापडत नव्हता. आता त्यात नाशिकच्या माजी महापौर आणि माजी राज्यमंत्री डॉक्टर शोभा बच्छाव (Shobha Bacchav) तसेच सटाणा येथील भाजपचे विलास बच्छाव ही दोन नवीन नावे पुढे आली आहेत. मात्र, त्याबाबत अद्याप चर्चा सुरू असल्याने अंतिम निर्णय झालेला नाही.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र भोसले (Rajendra Bhosale) आणि धुळे येथील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते शरद पाटील यांनी नवीन चेहरा देण्यासाठी वरिष्ठांची भेट घेतली आहे. येत्या एक-दोन दिवसांमध्ये स्थानिक शिष्टमंडळ पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेणार आहे. मात्र, या घडामोडी सुरू असतानाच वंचित बहुजन आघाडीने मात्र काँग्रेसकडून संधी न मिळालेल्या अब्दुल रहमान यांना उमेदवारी जाहीर केली आहे. रहमान यांचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. त्यामुळे ते मतदारसंघात किती प्रभावी ठरतील हा प्रश्नच आहे. मात्र, अल्पसंख्याक मतांमध्ये फूट पडण्याची शक्यता आहे. त्याचा लाभ भाजपला होणार आहे. त्यामुळे वंचितने उमेदवार देऊन काँग्रेसला अपशकून केला आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी काँग्रेस काय उपाययोजना करते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

R

Abdul Rahman
Dispute In Mahayuti : नाशिकमध्ये छगन भुजबळांची उमेदवारी निश्चित; खासदार हेमंत गोडसे बंडखोरीच्या तयारीत?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com