Dhule Loksabha Constituency : धुळ्यात 'वंचित'ला मोठा धक्का, काँग्रेसचा मार्ग मोकळा?

Abdul Rahman : रहमान यांचा अर्ज बाद ठरल्याने काँग्रेस उमेदवाराला मोठा दिलासा मिळाला आहे. विशेषतः मालेगाव शहर आणि धुळे शहरातील लक्षणीय अल्पसंख्यांक मतांचे वाटेकरी आता निवडणूक रिंगणात नसेल त्यामुळे ही मते काँग्रेस आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करेल.
Prakash Ambedkar Abdul Rahman
Prakash Ambedkar Abdul Rahmansarkarnama
Published on
Updated on

Loksabha Election : धुळे लोकसमा मतदारसंघाच्या उमेदवारांच्या अर्ज छाननीमध्ये वंचितला मोठा धक्का बसला आहे. वंचितचे अधिकृत उमेदवार अब्दुर रहमान यांचा अर्ज आज (शनिवारी) निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अवैध ठरविला. अर्जांच्या छाननीची प्रक्रिया सुरू असताना या अर्जामध्ये काही अनियमितता आढळल्याने रहमान यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला.

रहमान Abdul Rahman हे निवृत्त पोलिस अधिकारी आहेत. त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. त्याच्या निवृत्तीनंतर शासकीय स्तरावर अपेक्षित असलेल्या काही पूर्तता झालेल्या नाहीत. त्यामुळे त्यांना सेवेतून निवृत्त करण्याची प्रक्रिया अपूर्ण असल्याचा दावा यावेळी करण्यात आला. या नियमाच्या आधारे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज अवैध ठरविला आहे. त्यामुळे या मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस Congress अशी थेट लढत होणार आहे.

Prakash Ambedkar Abdul Rahman
Ambedkar Nagar Tour : प्रकाश आंबेडकरांनी उडवली भाजपच्या ‘चारशे पार’ची खिल्ली!

रहमान यांचा अर्ज अवैध ठरल्याने वंचितला विशेषता मालेगाव शहरातील राजकारणात मोठा धक्का बसला. रहमान यांचा अर्ज बाद झाल्याने धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे Subhash Bhamre आणि काँग्रेसच्या माजी राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव यांच्यात सरळ लढत आहे. दरम्यान, या निर्णय प्रक्रियेबाबत रहमान यांनी आक्षेप घेतला आहे. या संदर्भात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे उच्च न्यायालयात त्यांना काय प्रतिसाद मिळतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेसला दिलासा

रहमान यांचा अर्ज बाद ठरल्याने काँग्रेस उमेदवाराला मोठा दिलासा मिळाला आहे. विशेषतः मालेगाव शहर आणि धुळे शहरातील लक्षणीय अल्पसंख्यांक मतांचे वाटेकरी आता निवडणूक रिंगणात नसेल त्यामुळे ही मते काँग्रेस आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करेल. यापूर्वी तीन निवडणुकांमध्ये अल्पसंख्यांक उमेदवार देऊन काँग्रेसच्या मतांमध्ये विभागणी करण्याचे डावपेच भारतीय जनता पक्ष करत आल्याचे बोलले जाते. यंदा मात्र तशी शक्यता नाही. मात्र, आपल्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने वंचित कुठल्या अपक्ष उमेदवाराला पाठींबा देते हे पाहणे महत्त्वाचे आहे.

(Edited By Roshan More)

Prakash Ambedkar Abdul Rahman
Lok Sabha Election 2024 : ओवेसी संभाजीनगरात येणार; इम्तियाज जलील यांच्या विजयासाठी जंग जंग पछाडणार!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com