Dhule Politics: 'सेटलमेंट' वरुन आजी-माजी आमदारांमध्ये जुंपली; धुळ्याचा विकास कुणी केला?

MLA Farooq Shah Anil Gote Dhule city Development: अनिल गोटे यांनी पंधरा वर्षांच्या आमदारकीच्या काळाच फक्त 'सेटलमेंट'केली. पत्रकबाजी करीत १५ वर्ष आमदारकी केली, असा घणाघात शाह यांनी गोटे यांच्यावर केला आहे.
Dhule Politics
Dhule PoliticsSarkarnama
Published on
Updated on

विधानसभा निवडणुकीपूर्वीच धुळ्यात पुन्हा एकदा आजी-माजी आमदारांमध्ये चांगलीच जुंपली आहे. काही महिन्यापासून दोन्ही नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फेरी झडत आहेत. धुळे शहराचा विकास कुणी केला, सेटलमेंट कुणी यावरुन हल्लाबोल सुरु आहे.

धुळे शहराचे आमदार फारुक शाह यांनी माजी आमदार अनिल गोटे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अनिल गोटे यांनी पंधरा वर्षांच्या आमदारकीच्या काळाच फक्त 'सेटलमेंट'केली. पत्रकबाजी करीत १५ वर्ष आमदारकी केली, असा घणाघात शाह यांनी गोटे यांच्यावर केला आहे.

धुळ्यात विविध विकास कामांचे उद्धघाटन शाह यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी माजी आमदार अनिल गोटे यांच्यावर आगपाखड केली. आमदार अनिल गोटे यांनी पंधरा वर्षात धुळे शहराचा कुठल्याही प्रकारचा विकास केला नसल्याचा आरोप शाह यांनी केला.

गेल्या काही दिवसांपूर्वी अनिल गोटे यांनी फारुक शाह यांच्यावर विकास कामांवरून आरोप केले होते. या आरोपांना शाह यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Dhule Politics
Kolhapur News: कोल्हापुरात 'खेडकर पॅटर्न', 'दिव्यांगा'चे बोगस प्रमाणपत्र मिळवून मनोज भोगटे झाला शाळा निरीक्षक

शहरातील निवारा मंडप, सार्वजनिक शौचालय, खुल्या जागेस कंपाउंड वॉल, सभागृह बांधणे यासह आतापर्यंत दुर्लक्षित विविध कॉलन्यांमधील रस्त्यांसाठी शासनाकडून दहा कोटी रुपये मंजूर झाले. मी केलेल्या पाठपुराव्यातून ही कामे मंजूर झाली आहे. येत्या महिनाभरात रस्त्यांची कामे सुरू होतील, असे आमदार शाह यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com