Kolhapur News: बनावट संशयास्पद दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून आयएएस झालेल्या पूजा खेडकर यांचे प्रकरण गाजत असतानाच मनोज भोगटे यांनी खेडकर पॅटर्नचा अवलंब करत प्रशासनाची तारांबळ उडवून दिली आहे.
कोल्हापुरातून दिव्यांग प्रमाणपत्र बोगस सादर करून भोगटे चक्क निरीक्षक प्रमाणित शाळा आणि संस्था वर्ग दोन या पदासाठी शाळा निरीक्षक बनला आहे. त्याचे बींग नाशिक मधून फुटल्यानंतर मनोज भोगटे याचा 'पराक्रम' समोर आला आहे. त्यामुळे त्याची निवड वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
देश आणि राज्यातील घेत असलेल्या नागरी सेवा परीक्षांमध्ये दिव्यांगांसाठी विशेष आरक्षण दिले जाते. यावेळी शासकीय रुग्णालयातून खातरजमा करून दिव्यांगांची शारीरिक तपासणी करून अधिकृतरित्या दिव्यांग प्रमाणपत्र दिले जाते. हेच प्रमाणपत्र ग्राह्य धरून देश आणि राज्यातील नागरी सेवा परीक्षांमध्ये दिव्यांग बांधवांना नोकरीची संधी दिली जाते.
मनोज भोगटे याने 15 मार्च 2019 रोजी कोल्हापुरातील राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून दिव्यांग प्रमाणपत्र मिळवले होते. त्या आधारे राज्यसेवेच्या माध्यमातून तात्पुरत्या निवड यादीमध्ये गट ब मध्ये स्थान मिळवले होते. मात्र शारीरिक तपासणीवेळी दोन वेळा तो गैरहजर राहिल्याची माहिती समोर आली आहे. त्याचे प्रमाणपत्र तपासले असता ते बनावट असल्याचे समोर आले आहे.
प्रमाणपत्र तपासले असता त्यावर असणाऱ्या स्वाक्षऱ्या बोगस असल्याचे निदर्शनास आले आहे. महाविद्यालयातील अधिष्ठाता यांनी काढलेल्या पत्रात नमूद केलेल्या नुसार, भोगटे यांनी सादर केलेल्या प्रमाणपत्रांमध्ये माझी सही दिसून येते. मात्र ही सही बनावट आहे. त्यावेळी मी त्या पदावर कार्यरत नव्हतो, असे अधिष्ठाता डॉ. सत्यवान मोरे यांनी नमूद केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.