Fake voting cards Dhule : मतदान प्रक्रियेला धक्का! धुळ्यात हजारो मतदान कार्ड सापडले; उमेदवारांची पुरती उडाली घाबरगुंडी, आयोग चौकशीत गुंतला

Dhule Municipal Election : Inquiry into Bogus Voter ID Cards in Devpur : धुळे महापालिका निवडणुकीत देवपूर इथं हजारो बोगस मतदान कार्डचा साठा सापडल्यानं खळबळ उडाली आहे.
Dhule Municipal Election; commissioner nitin kapadnis
Dhule Municipal Election; commissioner nitin kapadnissarkarnama
Published on
Updated on
Summary
  • धुळे शहरातील देवपूर भागात हजारो मतदान कार्ड बेवारस अवस्थेत सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

  • AIMIM पक्षाने या बोगस मतदान कार्डांमागे राष्ट्रवादी काँग्रेसचा हात असल्याचा आरोप केला आहे.

  • महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी निवडणूक आयोगाच्या पथकाला सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.

Dhule Municipal Election : राज्यात महापालिका निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास शिल्लक राहिले असतानाच, धुळे इथं हजारो बोगस मतदान कार्डाचा साठा आढळला आहे. यामुळे उमेदवारांची पुरती घाबरगुंडी उडाली असून, हा साठा कोणाच्या मुळावर आणण्यासाठी आणला होता, याची चर्चा रंगली आहे. दरम्यान, महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस याप्रकाराची गंभीर दखल निवडणूक आयोगाच्या आचारसंहिता कक्षाच्या पथकाला याच्या सखोल चौकशीचा आदेश दिला आहे.

धुळे शहरातील देवपूर भागात हजारो मतदान कार्ड बेवारस अवस्थेत सापडले. या कार्डविषयाची माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरल्याने वेगवेगळ्या चर्चेला तोंड फुटलं आहे. या बोगस मतदान कार्डमुळे मोठी खळबळ उडाली असून, हा सर्व प्रकार 'AIMIM' पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी उघडकीस आणला आहे. या बोगस मतदान कार्डमागे 'AIMIM'ने थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर निशाणा साधला आहे.

'AIMIM'च्या कार्यकर्त्यांनी हा साठा शोधून काढल्याने प्रशासनाच्या कारभारावर उमेदवारांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहेत. इतक्या मोठ्या संख्येने मतदान कार्ड बाहेर कसे आले आणि त्याचा उद्देश काय होता, यावर वेगवेगळ्या चर्चांना तोंड फुटले आहे. मतदानाला अवघे काही तास राहिले असताना, ही बोगस मतदान कार्ड सापडल्याने निवडणुकीत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Dhule Municipal Election; commissioner nitin kapadnis
Kolhapur Municipal Election : सतेज पाटलांचे अस्तित्व पणाला; सत्तेला सुरूंग लावण्यासाठी महाडिक-क्षीरसागरांनी लावला जोर...

या सर्व बोगस मतदान कार्डामागे राष्ट्रवादी काँग्रेसचा हात असल्याचा संशय 'AIMIM'ने संशय व्यक्त केल्याने अधिकच खळबळ उडाली आहे. यामुळे शहरातील राजकीय वातावरण देखील तापलं आहे.

'AIMIM'चे इर्शाद जहागीरदार यांनी आयुक्त नितीन कापडणीस यांची भेट घेत ही बोगस मतदान कार्ड त्यांच्या टेबलावर ठेवली आणि चौकशीची मागणी केली. ही बोगस कार्ड मतदानाच्या दिवशी वाटण्यात येणार होती का? यामागे राजकीय कटकारस्थान आहे, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली.

दरम्यान, महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून, निवडणूक आयोगाच्या आचार संहिता कक्षाचे प्रमुख यांना चौकशीचा आदेश दिला आहे. चौकशी करून तत्काळ अहवाल सादर करण्याचा सूचना आहे. यात कोणी दोषी आढळल्यास पोलिसांमार्फत कायदेशीर कारवाई केली जाईल, असाही इशारा नितीन कापडणीस यांनी दिला.

Dhule Municipal Election; commissioner nitin kapadnis
Municipal Corporation Election : स्वबळावर लढणाऱ्या राजकीय पक्षांची ताकद दिसणार, संभाजीनगरमध्ये खान-बाण-की भगव्याची शान?

FAQs :

1. धुळ्यात नेमकं काय सापडलं आहे?
देवपूर परिसरात हजारो मतदान कार्ड बेवारस अवस्थेत आढळून आली आहेत.

2. हा प्रकार कोणी उघडकीस आणला?
AIMIM पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी हा प्रकार उघड केला आहे.

3. AIMIM ने कोणावर आरोप केला आहे?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर बोगस मतदान कार्डांचा आरोप केला आहे.

4. प्रशासनाने काय कारवाई केली आहे?
महापालिका आयुक्तांनी निवडणूक आयोगाच्या आचारसंहिता कक्षाला चौकशीचे आदेश दिले आहेत.

5. या प्रकरणाचा निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतो?
मतदार यादी व निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्न निर्माण होऊ शकतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com