Dhule News : आरोपीने सिगारेट ओढली.. पण शिक्षा तीन पोलिसांना झाली, तिघेही निलंबित ! नेमकं काय घडलं?

A suspect smoked a cigarette while in custody, resulting in the suspension of three police constables in Dhule : न्यायालयात सुनावणीसाठी नेले जात असताना एका संशयित आरोपीने सिगारेट ओढली. मात्र त्याच्या या वर्तणुकीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या तीन अंमलदारांवर कारवाई झाली.
dhule police, Shri. Shrikant Dhivare, I.P.S.
Superintendent of Police, Dhule
dhule policeSarkarnama
Published on
Updated on

Dhule News : न्यायालयात सुनावणीसाठी नेले जात असताना एका संशयित आरोपीने सिगारेट ओढली. मात्र त्याच्या या वर्तणुकीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या तीन अंमलदारांवर कारवाई झाली. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी या तिघांना तत्काळ निलंबित करत विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये अटक करण्यात आलेला आरोपी अकबर जलेला उर्फ अकबरअली कैसरअली शाह याच्याविरुद्ध चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. तो सध्या जिल्हा कारागृहात कोठडीत असून, मंगळवारी दुपारी त्याला न्यायालयात हजर करण्यासाठी नेण्यात येणार होते. या कामासाठी पोलीस मुख्यालयातील अंमलदार राहुल जगताप, वसीम शेख आणि महेंद्र जाधव यांची देखरेखीच्या जबाबदारीसाठी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, या तिघांच्या उपस्थितीतच आरोपी अकबरने सिगारेट ओढल्याची घटना घडली.

संशयित आरोपीच्या कृत्याकडे दुर्लक्ष केल्याने अंमलदार राहुल जगताप, वसीम शेख आणि महेंद्र जाधव तिघांना तडकाफडकी निलंबित करून त्यांच्या विभागीय चौकशीचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिले. आरोपींनी सिगारेट ओढली पण तीन पोलीस अमंलदारांना शिक्षा झाल्याने जिल्ह्यात या प्रकरणाची चांगलीच चर्चा झाली.

dhule police, Shri. Shrikant Dhivare, I.P.S.
Superintendent of Police, Dhule
Gulabrao Devkar : घड्याळ हातात घातलं, पण संकट टळलं नाही ! गुलाबराव देवकर 10 कोटींच्या कर्ज प्रकरणात दोषी

अकबर हा सिगारेट ओढत असतानाचे काही फोटो वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले. त्यानंतर प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली. पोलीस कोठडीत असलेल्या आरोपीला सिगारेट ओढण्यास परवानगी कशी मिळाली? हे प्रश्न उपस्थित झाले. संशयिताने पोलीस कोठडीत असताना सिगारेट ओढल्याची घटना आणि त्याचे छायाचित्र सार्वजनिक झाल्याने, पोलीस दलाची प्रतिमा मलीन होऊ शकते त्यामुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी गंभीर दखल घेत तीनही पोलिस अंमलदारांवर निलंबनाची कारवाई केली.

dhule police, Shri. Shrikant Dhivare, I.P.S.
Superintendent of Police, Dhule
Suhas Kande : 'एवढे लोक मेले'... आमदार सुहास कांदे सभागृहात आक्रमक, नेमकं काय घडलं?

जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये अटकेत असलेल्या संशयितांना कोठडीत ठेवले जाते. अशा वेळी काही संशयितांना त्यांच्या दैनंदिन सवयींनुसार मर्यादित स्वातंत्र्य दिले जात असल्याचे आरोप वेळोवेळी समोर येत असतात. तथापि, सराईत गुन्हेगारांच्या बाबतीत पोलीस यंत्रणा अधिक कडक आणि नियमानुसार कारवाई करते. अशा प्रकरणांमध्ये नियमांमध्ये कोणतीही शिथिलता दाखवण्याचे धाडस पोलीस अधिकाऱ्यांकडून सहसा होत नाही, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com