Dhule: सभापतींच्या हजेरीत १२५ पैकी १०५ कर्मचारी निघाले लेटलतीफ!

सभापती विजय पाटील यांनी गेटवरच घेतली कर्मचाऱ्यांची झाडाझडती!
Chairmen Vaijay patil
Chairmen Vaijay patilSarkarnama

धुळे : पंचायत समितीचे (Dhule Panchayat Samiti) सभापती प्रा. विजय पाटील (Vijay Patil) यांनी गुरुवारी कर्मचाऱ्यांची चांगलीच झाडाझडती (Taken attendence) घेतली. त्यावेळी १२५ पैकी १०५ कर्मचारी लेटलतीफ, तर वीस ऑनड्युटी आढळले. (Chairmen Vijay Patil taken attendence and warns employees for duty)

Chairmen Vaijay patil
Eknath Shinde: महाविकास आघाडीच्या नियोजन समिती सदस्यांना घरचा रस्ता!

पंचायत समितीच्या प्रवेशद्वाराला कुलूप ठोकून त्यांनी कामचुकार कर्मचाऱ्यांची खरपूस हजेरी घेतली. ग्रामीण जनतेला वेळ देण्याऐवजी तिचा अपव्यय करणाऱ्यांना त्यांनी वठणीवर आणले.

Chairmen Vaijay patil
आमदार चव्हाण यांच्या फेसबुकवर काळा बुरखाधारी सुरा घेतलेली व्यक्ती कोण?

पंचायत समितीत १२५ अधिकारी व कर्मचारी आहेत. त्यात कर्मचाऱ्यांना शोधावे लागते, अशा तक्रारीत वाढ होत होती. ते लक्षात घेत सभापती पाटील यांनी पंचायत समितीच्या प्रवेशद्वाराला गुरुवारी कुलूप ठोकले. ते सकाळी साडेनऊला पंचायत समितीत उपस्थित झाले. नंतर त्यांनी लेटलतीफांची हजेरी सुरु केली. यात तब्बल १०५ कर्मचारी लेटलतीफ असल्याचे समोर आले. त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच त्यांचे एक दिवसाचे वेतन कपात केले जाईल, असे सभापती पाटील यांनी सांगितले.

पंचायत समितीत पूर्णवेळ कार्यभार असलेले गटविकास अधिकारी नाहीत. त्यामुळे प्रशासनावर वचक उरलेला नाही. राज्य शासनाकडे गटविकास अधिकाऱ्यांची मागणी केली आहे, असे सांगत सभापतींनी धुळे तालुक्यातील जनतेचे प्रश्‍न मार्गी लागण्यासाठी कर्मचाऱ्यांवर वचक ठेवला जाईल, असेही स्पष्ट केले.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com