Girish Mahajan Politics: गिरीश महाजनांना मोठा झटका, भाजप नेते दिलीप खोडपे यांचा राजीनामा!

Dilip khodpe Politics, A blow to Girish Mahajan, resignation of BJP leader in Jamner-जळगाव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, भाजप नेते दिलीप खोडपे यांनी दिला पक्षाचा राजीनामा, मंत्री महाजन यांना देणार आव्हान?
Girish Mahajan & Dilip Khodpe
Girish Mahajan & Dilip KhodpeSarkarnama
Published on
Updated on

BJP Vs NCP News: जळगाव जिल्ह्यातील भाजपमध्ये असलेली खदखद अखेर आज व्यक्त झाली. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदार संघातील एका मोठ्या नेत्याने पक्षाचा राजीनामा दिला. यावेळी त्यांनी मंत्री महाजन आणि भाजपमध्ये प्रामाणिक कार्यकर्च्यांचा होणारा कोंडमारा, गैरप्रकारांचा उल्लेख केला.

भाजप नेते आणि जळगाव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे यांनी पक्षाचा राजीनामा दिला. आज त्यांनी याबाबत दिलेल्या राजीनामा पत्रात पक्षाच्या कार्यपद्धतीवर आणि जिल्ह्यातील नेत्यांवर अप्रत्यक्षरीत्या गंभीर आरोप केले आहेत. हा राजीनामा भाजपला मोठा धक्का मानला जातो.

भाजपमध्ये सध्या केवळ पैसे कमविण्याची स्पर्धा सुरू आहे. दुसऱ्याला बदनाम करून मोठे होण्याची ओढ सुरू आहे. प्रत्येक गावात पक्षामध्ये दोन गट तयार केले जात आहेत. गेली ३५ वर्षे भाजपच्या विस्तारासाठी काम केले. सध्याच्या पक्षांतर्गत स्थितीमुळे अस्वस्थ होऊन राजीनामा देत आहे, असे त्यांनी म्हटले.

निष्ठावंत कार्यकर्ते व नेते अस्वस्थ आहेत त्यांची अवहेलना केली जात आहे. असे अनेक आरोप या राजीनामा पत्रात आहेत. जळगाव भाजपचे नेतृत्व मंत्री गिरीश महाजन करतात. त्यामुळे यानिमित्ताने महाजन यांची कार्यपद्धती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

Girish Mahajan & Dilip Khodpe
Dhangar Reservation : पडळकर, शेंडगे शिष्टमंडळाला समाजाची मान्यताच नाही; आता जलसमाधीच...

भाजपचे नेते श्री खोडपे हे मंत्री महाजन यांच्या विधानसभा मतदारसंघ जामनेर येथील आहेत. ते मंत्री महाजन यांचे निकटवर्तीय होते. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्याचा आगामी विधानसभा निवडणुकीत परिणाम दिसेल.

श्री खोडपे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत येत्या २१ सप्टेंबरला जामनेर येथे प्रवेश करणार आहेत. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी त्याला संमती दिली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मंत्री महाजन यांची जामनेर विधानसभा मतदारसंघातील वाट सोपी राहिलेली नाही, हे या राजीनामाच्या निमित्ताने स्पष्ट झाले. मंत्री महाजन यांना श्री. खोडपे आव्हान देणार आहे. त्यांना बहुजन समाजातील विविध घटकांचा पाठींबा आहे.

Girish Mahajan & Dilip Khodpe
Muslim voters : मुस्लिम मतांची धास्ती, आता 'षडयंत्र'; 'MIM'च्या अशरफींचा खळबळजनक आरोप

आगामी विधानसभा निवडणुकीत जामनेर मतदार संघातून श्री खोडपे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. श्री महाजन यांचे कट्टर विरोधक एकनाथ खडसे यांचे देखील या राजकीय घडामोडींमध्ये पडद्यामागे मोठी भूमिका असल्याचे बोलले जाते.

या निमित्ताने जामनेर मतदार संघात मंत्री महाजन यांना मोठा धक्का बसू शकतो. त्यामुळे श्री खोडपे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवेश रोखण्यासाठी श्री महाजन गेले दोन दिवस प्रयत्नशील होते.

रविवारी मंत्री महाजन यांनी जामनेर मतदार संघात विविध बैठका घेऊन श्री खोडपे यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर मोठा राजकीय दबाव होता. मंत्री महाजन यांनी विविध पदाधिकारी, नेत्यांमार्फत खोडपे यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना यश आले नाही.

भाजपच्या विविध नेत्यांचा दबाव झुगारून श्री खोडपे यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. हा राजीनामा मंत्री महाजन यांना मोठा राजकीय धक्का मानला जातो. या राजीनाम्याने मी विधानसभा निवडणुकीत जामनेर मतदार संघात मोठी चुरस निर्माण होईल.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com