Muslim voters : मुस्लिम मतांची धास्ती, आता 'षडयंत्र'; 'MIM'च्या अशरफींचा खळबळजनक आरोप

MIMs Pervez Ashrafi alleges that there is a conspiracy to exclude Muslims from the voter list : मुस्लिम मतदारांविरोधी समाजविघातक प्रवृत्ती कार्यरत झाल्याचा 'MIM'चे नेते परवेज अशरफी यांनी मोठा दावा केला आहे.
Muslim voters
Muslim votersSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतदार निर्णायक ठरला. हा मतदार महाविकास आघाडीकडे गेल्याने महायुती भाजपला फटका बसला. आता विधानसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाची धास्ती महायुतीला वाढली असून, मतदार यादीतून मुस्लिम मतदारांचे नाव वगळण्याची कटकारस्थान रचले जात आहे.

'नगर जिल्ह्यात काही समाजविघातक वृत्ती प्रशासनाला हाताशी धरून असे षडयंत्र रचत आहेत. त्याला प्रशासनाकडून बळ मिळत आहे', असा खळबळजनक आरोप 'MIM'चे नेते डाॅ. परवेज अशरफी यांनी केला.

'MIM'चे नेते डाॅ. परवेज अशरफी यांनी अहमदनगर जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना पत्र दिलं आहे. अहमदनगर जिल्ह्यात मतदार याद्या अद्यावत करण्याचं काम सुरू आहे. बहुतांशी ठिकाणी मतदार याद्यांमधून मुस्लिमांचे नाव कमी करण्याचं आणि वगळण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत. निवडणूक आयोग, जिल्हा निवडणूक शाखा आणि स्थानिक सक्षम अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार होत आहे. परंतु त्यावर कार्यवाही होताना दिसत नाही, असे अशरफी यांनी पत्रात म्हटलं आहे.

Muslim voters
Balasaheb Thorat : राऊत दाम्पत्याबरोबर घडलेल्या घटनेवरून थोरातांचा महायुती सरकारवर निशाणा, म्हणाले...

अशरफी यांनी पत्रात म्हटले आहे की, "मतदार (Voter) यादीतील नावांवर हरकत घेताना, काही जाणिवपूर्वक टार्गेट केलं जात आहे. मतदार यादी, मतदार नोंदणी क्रमांक, इपिक क्रमांक सर्व काही वेगवेगळं असताना देखील, त्यावर जाणून बुजून हरकती घेतल्या जात आहेत. मुस्लिमांमध्ये एक नावाच्या अनेक व्यक्ती आहेत. त्यामुळे मतदार यादीत सारखे नाव असलेल्या व्यक्त असू शकतात. तसेच एकाच नावाचे दहा वेगवेगळ्या यादीत नाव असू शकतात". निवडणूक शाखेकडून अशांना पत्र लिहिले आहे. असे असले, तरी या व्यक्ती वेगवेगळ्या आहेत. फक्त आक्षेप घेतल्याने या सर्वांना नोटीस काढल्या आहेत. हे एकप्रकारे मुस्लिम मतदारांना टार्गेट करण्याचे षडयंत्र आहे, असेही अशरफी यांनी म्हटलं आहे.

Muslim voters
Sudhakar Badgujar Politics: शिवसेना जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या मुलाविरोधात गोळीबाराचा गुन्हा?

लोकशाहीचा अपमान, गुन्हा नोंदवा

दरम्यान, कोल्हापूरमधील शिंगणापूर ग्रामपंचायतीचा अल्पसंख्याक मतदारांची मतदार यादीत नोंद होऊ नये यासाठी केलेल्या ठरावाची प्रत व्हायरल समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाली आहे. यावर मुस्लिम अल्पसंख्याकांमध्ये संतप्त भावना आहेत. अल्पसंख्याकांना टार्गेट केलं जात आहे. हा प्रकार म्हणजे, देशद्रोहाचा आहे. कायद्यानुसार असा ठराव करणाऱ्या ग्रामपंचायतीमधील सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचयातीच सर्व सदस्य, गटविकास अधिकारी, तहसिलदार यांच्यासह प्रांताधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणीही परवेज अशरफी यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com