Lok Sabha Election 2024 : लक्षद्वीप कुणाचं? दादांचं की साहेबांचं? घड्याळ चालणार की तुतारी वाजणार?

Lakshadweep Lok Sabha Election 2024 : 2014 आणि 2019 या दोन्ही वेळेस मोहम्मद फैजल पडीप्पुरा हे राष्ट्रवादीचे खासदार म्हणून निवडून आले. त्यांनी मागील दोन्ही निवडणुकीत काँग्रेसकडून उभे राहिलेल्या हमदुल्लाह सईद यांचा पराभव केला.
Sharad Pawar Ajit Pawar Lakshadweep Lok Sabha Election 2024
Sharad Pawar Ajit Pawar Lakshadweep Lok Sabha Election 2024 Sarkarnama

Lakshadweep News : महाराष्ट्रात राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) घटक पक्ष म्हणून निवडणूक लढवत असतानाच लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशात मात्र हे दोन्ही पक्ष आमनेसामने उभे ठाकले. इतकंच नव्हे तर महाराष्ट्रातील बारामती (Baramati) आणि शिरूर (Shirur) या दोन लढतींप्रमाणे लक्षद्वीपमध्येही राष्ट्रवादी शरद पवार गट विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात सामना रंगला. लक्षद्वीपच्या एका जागेसाठी दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीनही पक्षांच्या उमेदवारांनी एकमेकांविरुद्ध निवडणूक लढवली. (Latest Marathi News)

देशातील 28 राज्यांसह 8 केंद्रशासित प्रदेशांतही लोकसभा निवडणूक होत आहे. 8 केंद्रशासित प्रदेशांपैकीच एक म्हणजे लक्षद्वीप! येथे लोकसभेच्या एका जागेसाठी पहिल्या टप्प्यात म्हणजे 19 एप्रिल रोजी मतदान पार पडलं. या ठिकाणी भाजपचा उमेदवार निवडणूक रिंगणात नसला तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातील पारंपरिक सामना मात्र चांगलाच रंगला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लक्षद्वीपमध्ये पहिल्यांदाच दोन राष्ट्रवादी आमनेसामने!

2023 मध्ये अजित पवारांनी बंड केल्यानं राष्ट्रवादी फुटली आणि या पक्षाची महाराष्ट्रासह देशपातळीवरील राजकीय समीकरणं बदलली. राष्ट्रवादी हा मूळ पक्ष अजित पवारांकडं गेल्यानंतर त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून लक्षद्वीपमध्ये लक्ष घातलं आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या घड्याळ या मूळ चिन्हावर यूसुफ टीपी हा उमेदवार उभा केला.

Sharad Pawar Ajit Pawar Lakshadweep Lok Sabha Election 2024
Ramdas Athawale: 'दुनिया में जहाँ भी देखूंगा शिप...मुझे याद आयेगा लक्षद्वीप ...! आठवलेंना भावले लक्षद्वीप !

शरद पवारांनी देखील लक्षद्वीप आपल्याकडंच राहावं म्हणून दोन वेळा खासदार राहिलेल्या मोहम्मद फैजल पडीप्पुरा यांना आपल्या पक्षाकडून निवडणूक रिंगणात उतरवलं. दोन्ही राष्ट्रवादी गटाचे उमेदवार समोरासमोर उभे असताना काँग्रेसनं देखील आपला उमेदवार रिंगणात उतरवत निवडणुकीत रंग भरला. काँग्रेसनं पुन्हा एकदा मोहम्मद हमदुल्लाह सईद यांनाच उमेदवारी दिली आहे. त्यामुळं लक्षद्वीपमध्ये मोहम्मद फैजल पडीप्पुरा आणि मोहम्मद हमदुल्लाह सईद यांच्यात सलग तिसऱ्यांदा लढत पाहायला मिळाली.

लक्षद्वीपमध्ये गेली दहा वर्षे राष्ट्रवादीचा खासदार-

गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकीपासून (Lok Sabha) लक्षद्वीपवर राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व राहिलं आहे. 1999 मध्ये राष्ट्रवादीची स्थापना केल्यानंतर शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा देशात विस्तार करत पक्षाला राष्ट्रीय दर्जा मिळवून दिला. लक्षद्वीपमध्येही पक्षाची चांगली बांधणी करून पक्ष वाढवला आणि राजकीय अनुभव तसेच पक्षीय संघटनेच्या जोरावर लक्षद्वीपमध्ये आपला उमेदवार सलग दोनदा निवडून आणला. 2014 आणि 2019 या दोन्ही वेळेस मोहम्मद फैजल पडीप्पुरा हे राष्ट्रवादीचे खासदार म्हणून निवडून आले. त्यांनी मागील दोन्ही निवडणुकीत काँग्रेसकडून उभे राहिलेल्या हमदुल्लाह सईद यांचा पराभव केला.

Sharad Pawar Ajit Pawar Lakshadweep Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election : '400 पार' झाल्यास ज्ञानव्यापी मशिदीच्या जागी मंदिर, POK वर ताबा... ; भाजप मुख्यमंत्र्यांचा दावा!
Sharad Pawar Ajit Pawar Lakshadweep Lok Sabha Election 2024
NCP Party Symbol Case : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हाची सुनावणी आता जुलै महिन्यात !

लक्षद्वीपची लढत लक्षवेधी!

महाराष्ट्रात राष्ट्रवादी शरद पवार गट (Sharad Pawar) आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष महाविकास आघाडीचे घटक पक्ष म्हणून निवडणूक लढवत असतानाच लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशात मात्र हे दोन्ही पक्ष एकमेकांविरुद्ध लढताना पाहायला मिळाले हे विशेष! आता प्रतीक्षा निकालाची! लक्षद्वीपमध्ये तिसऱ्यांदा घड्याळ चालणार की तुतारी वाजणार, हे पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com