दिनकर आणि दशरथ पाटील हे सख्खे भाऊ पुन्हा लढणार!

महापालिका निवडणुकीत सातपूरची पाटीलकी यंदा कोणाला मिळणार याची उत्सुकता.
Dinkar Patil & Dasharath Patil
Dinkar Patil & Dasharath PatilSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : महापालिकेच्या (NMC) निवडणुकीत यापूर्वी नगरसेवक दिनकर पाटील (Dinkar Patil) आणि माजी महापौर दशरथ पाटील (Dashrath Patil) या सख्ख्या भावांमध्ये यापूर्वी लढत रंगली होती. त्याची पुनरावृत्ती यंदा पुन्हा होत आहे. फक्त हे दोघे लढणार की, त्यांची मुले हे लवकरच स्पष्ट होईल. दिनकर पाटील भाजपचे (BJP)तर दशरथ पाटील शिवसेनेचे (Shivsena) उमेदवार असतील हे नक्की झालेय.

Dinkar Patil & Dasharath Patil
छगन भुजबळ म्हणाले, `शेतकऱ्यांना दिवसाच वीज द्या`

राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या या प्रभागात यंदाही पाटील कुटुंबीयांभोवतीच निवडणूक केंद्रित होणार आहे. या भागातील भाजपचे सर्वेसर्वा व पाच वर्षे महापालिका गाजविणारे दिनकर पाटील व माजी महापौर दशरथ पाटील यांचे पुत्र प्रेम पाटील यांच्यातील सरळ लढत लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे. दिनकर पाटील पक्षाच्या भरवशावर न राहता स्वतःच्या ताकदीवर लढत देतील, तर प्रेम यांना शिवसेनेसह अन्य पक्षांची रसद मिळणार आहे. त्यामुळे पुन्हा पाटील कुटुंबीयाभोवतीच केंद्रित होणाऱ्या निवडणुकीत कोण बाजी मारणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Dinkar Patil & Dasharath Patil
भाजप म्हणजे ‘भारत जलाव पार्टी’

दिनकर पाटील अनेक वर्षांपासून या भागाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत संपूर्ण पॅनल त्यांनी निवडून आणले. त्यामुळे यंदाही स्वतःबरोबरच पॅनल निवडून आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर राहणार आहे. श्री. पाटील त्यांच्या पॅनलमध्ये कोणाला सामावून घेतात, ही बाबही तेवढीच महत्त्वाची आहे. दिनकर पाटील यांना शिवाजीनगर भागात पराभूत करण्यासाठी अनेक जण पाण्यात देव बुडवून ठेवतात. मात्र, त्याचा उपयोग होत नाही, हा अनुभव आतापर्यंत आहे. गेल्या निवडणुकीत प्रेम पाटील यांना दिनकर पाटलांविरोधात पुढे करण्यात आले. मात्र, तेथेही दिनकर पाटील यांनी बाजी मारली. यंदाही अण्णा हटाव मोहिमेसाठी विरोधक एक झाले आहेत. त्यामुळे अण्णा हरतात की पुरून उरतात, हे पाहणे त्या प्रभागासाठी राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे ठरेल.

हे आहेत इच्छुक

दिनकर पाटील, लता पाटील, अमोल पाटील, प्रेम दशरथ पाटील, सविता गायकर, सागर झारे, अरुण पाटील, प्रमोद जाधव, साहेबराव जाधव, अर्चना तुपलोंढे, संजय तुपलोंढे, विकास काबंळे, कविता काबंळे, रवींद्र धिवरे, प्रकाश महाजन, कल्पेश कांडेकर, हेमलता कांडेकर, दिनकर कांडेकर.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com