Dipankar Bhattacharya : मोदी सरकार अदानी-अंबानींसारख्या काही धनिकांच्या सेवेत; दीपांकर भट्टाचार्य यांचा घणाघात

Dipankar Bhattacharya Slams BJP Narendra Modi Government at CPI (ML) Liberation Merger in Shrirampur Ahilyanagar : श्रीरामपूर इथं भाकप (माले) लाल निशाण पक्षाच्या लिबरेशन गटाच्या एकत्रीकरण कार्यक्रमापूर्वी दीपांकर भट्टाचार्य यांची पत्रकार परिषद झाली.
Dipankar Bhattacharya
Dipankar BhattacharyaSarkarnama
Published on
Updated on

CPI ML Liberation merger : "केंद्रातील मोदी सरकार शेतकरी, कामगार, आदिवासी, महिलांपासून पूर्णपणे तुटले आहे.

सरकारचे धोरण हे उद्योगपतींना फायदेशीर ठरेल असेच असून, अदानी-अंबानींसारख्या काही धनिकांच्या सेवेसाठीच हे सरकार कार्यरत आहे", असा घणाघात भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी-लेनिनवादी) लिबरेशनचे महासचिव दीपांकर भट्टाचार्य यांनी केला.

श्रीरामपूर इथं भाकप (माले) लाल निशाण पक्षाच्या लिबरेशन गटाच्या एकत्रीकरण कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खासदार राजाराम सिंग, महिला आघाडीच्या नेत्या मीना तिवारी, बिहारच्या आमदार शशी यादव, महाराष्ट्रातील (Maharashtra) नेते उदय भट, बाळासाहेब सुरुडे, आनंदराव वायकर, राजेंद्र बावके, जीवन सुरुडे आदी उपस्थित होते.

पहलगाममध्ये दोन हजार पर्यटक असताना सुरक्षा का नव्हती? एवढ्या कडक बंदोबस्तात अतिरेकी आलेच कसे? त्यांनी कोणत्या मार्गाने प्रवेश केला, कुठे गेले आणि 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये किती जवान शहीद झाले याची माहिती सरकार देत नाही, असा सवाल उपस्थित करत भट्टाचार्य यांनी केंद्र सरकारवर (Central government) संशय व्यक्त करत एअर फोर्स प्रमुखांनीही नाराजी व्यक्त केली आहे. तरीही सरकार मौन आहे, असे ते म्हणाले.

Dipankar Bhattacharya
Narendra Modi political future : हे वर्ष मंगळाचे; ...तोपर्यंत देशात ‘मोदीराज’!

युद्ध नेमकं कोणी थांबवल

अमेरिकेचे डोन्लाड ट्रम्प म्हणतात युद्ध आम्ही थांबवलं, मोदी म्हणतात आम्ही थांबवलं मग सत्य काय आहे? पंतप्रधान मोदी केवळ शोलेसारखे डायलॉग मारीत आहेत. पण उत्तरदायित्व घेत नाहीत, अशी जहाल टीका दीपांकर भट्टाचार्य केली.

Dipankar Bhattacharya
Former Congress MLA joins NCP : ‘काँग्रेसचा परींदा‘ करणार अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; तारीखही ठरली

नऊ जुलैला देशव्यापी संप

कामगार, कष्टकरी, शेतकरी यांच्या विरोधात असलेल्या केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात नऊ जुलैला देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. या संपात शेतकरी संघटना, महिला संघटना आणि मजूर संघटनांचा सहभाग राहील, अशी घोषणा यावेळी करण्यात आली.

'बदलो सरकार बदलो बिहार'

महाराष्ट्र हा आरएसएसचा गड असला, तरी त्याच नागपुरात डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी बौध्द धर्माची दिक्षा घेतली आहे. ही शाहू-फुले-आंबेडकरांची पुरोगामी भूमी आहे. मात्र, सत्तेसाठी महाराष्ट्रात जसे राजकीय सौदे झाले, तसे बिहारमध्ये होऊ नयेत यासाठी जनता जागरूक आहे. 'बदलो सरकार बदलो बिहार' ही चळवळ बिहारमध्ये सुरू झाली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com