Jalgaon Politics: राष्ट्रवादीचा मोठा निर्णय; थेट जिल्हा बँकेच्या अध्यक्षाचीच पक्षातून केली हकालपट्टी

Ajit Pawar On Girish Mahajan Birthday Poster: भाजप नेत्यांच्या फोटोसोबत अजित पवारांचाही फोटो जाहिरातीत झळकवला होता.
Sanjay Pawar
Sanjay PawarSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon News : जळगाव जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली असून प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी याबाबतचे पत्र काढले आहे.

जळगाव जिल्हा सहकारी बँक अध्यक्षपदाची निवडीनंतर धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पक्षाच्या विरोधात भूमिका घेतल्याप्रकरणी अखेर बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून बडतर्फ करण्यात आले आहे. त्यांच्यावर पक्षविरोधी कारवाईचा ठपका ठेवण्यात आला असून प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी बुधवारी यासंदर्भात आदेश काढले.

Sanjay Pawar
Girish Mahajan Birthday: गिरीश महाजनांच्या होर्डिंगवर अजितदादा झळकले; नेमकं काय घडलं !

संजय पवार यांनी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पक्षाने ॲड.रवींद्र पाटील यांना उमेदवारी दिलेली असताना स्वत:उमेदवारी अर्ज दाखल करत पक्षविरोधात भूमिका घेतली. तसेच भाजप नेते व शिंदे गटाच्या संचालकांच्या मदतीने अध्यक्षपदही मिळवले. तेव्हाच त्यांच्या भूमिकेबद्दल जिल्हाध्यक्ष ॲड.पाटील यांनी प्रदेश नेतृत्वाकडे तक्रार केली होती.

त्यानंतर नुकत्याच झालेल्या धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पक्षाकडून कुठलीही परवानगी नसताना व स्वत:कुठल्याही पदावर नसताना शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी प्रणित सहकार पॅनलच्यावतीने निवडणूक लढवत असल्याचे फलक लावले. पक्षात कुठलाही गट नसताना संजय पवार गट असा उल्लेख, त्यावर पक्षाचे नाव, चिन्ह, नेत्यांचे फोटो छापून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण केला.

अशा प्रकारचे फलक काढून टाकण्याच्या सूचना केल्यानंतरही त्यावर कार्यवाही केली नाही. अशा प्रकारे पक्षविरोधात कृत्य केल्यामुळे पक्षातून १६ मे पासून बडतर्फ करण्यात येत असल्याचे पत्र संजय पवार यांना पाठविण्यात आले आहे. पत्रावर सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांची स्वाक्षरी आहे.

Sanjay Pawar
Shevgaon Bazar Samiti: शेवगाव बाजार समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादीचे एकनाथ कसाळ तर उपसभापतीपदी गणेश खंबरे

महाजनांच्या शुभेच्छा जाहिरातीत पवारांचा फोटो

भाजपनेते तथा राज्यातील मंत्री गिरीश महाजन यांचा बुधवारी (ता.१७) वाढदिवस होता. त्यांच्या वाढदिवसानिमित्त संजय पवार यांनी वृत्तपत्रातून आज शुभेच्छा जाहिरात दिली होती. त्यातही त्यांनी अजित पवार यांच्यासह विविध पक्षीय नेत्यांची छायाचित्रे वापरली. या जाहिरातीचीही आज दिवसभर चर्चा होती.

कारवाईवर काय म्हणाले संजय पवार?

"माझी पक्षातील बडतर्फी मला दु:ख देणारी आहे. मी पक्ष चिन्हाविरोधात कोणतेही काम केलेले नाही. माझा खुलासाही न घेता माझी एकतर्फी बडतर्फी करण्यात आली. माझ्या हृदयात शरद पवार, अजित पवार आहेत, ते कायम राहतील".

"सहकार क्षेत्रात त्यांचा फोटो मी यापुढेही वापरणार आहे. मी जिल्हा बँकेत अध्यक्ष झाल्याने वरीष्ठाकडे माझ्या खोट्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. पक्षाच्या जिल्ह्यातील नेत्यांचीही माझ्याकडे कोण कुणाला भेटत याची माहिती आहे, ती मी वरीष्ठांना भेटून देणार आहे", अशी प्रतिक्रिया संजय पवार यांनी दिली.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com