Girish Mahajan Birthday: गिरीश महाजनांच्या होर्डिंगवर अजितदादा झळकले; नेमकं काय घडलं !

Ajit Pawar On Girish Mahajan Birthday Poster: 'माझा वाढदिवस साजरा करु नका,'
Girish Mahajan Birthday NEW
Girish Mahajan Birthday NEW Sarkarnama

Girish Mahajan News: राज्याचे ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण तसेच क्रीडामंत्री गिरीश महाजन यांचा आज वाढदिवस (१७ मे). (ajit pawar photo published in girish mahajan birthday advertise)

वाढदिवस कोणीही साजरा न करण्याचे आवाहन महाजन यांनी त्यांचे कार्यकर्ते आणि चाहत्यांना केले आहे. पण काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी महाजन यांच्या वाढदिवसानिमित्ताने बॅनरबाजी केली आहे.

एका वृत्तपत्रात महाजन यांना वाढदिवसाची शुभेच्छा देणारी पानभर जाहिरात छापली आहे. या जाहिरातीत भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांचे फोटो आहेत. यासोबतच राष्ट्रवादीचे नेते, विरोधीपक्षनेते अजित पवार यांचाही फोटो या जाहिरातीत छापला आहे.

अजित पवार यांचा हा फोटो भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांच्या फोटो पेक्षा मोठा आहे. गिरीश महाजन यांच्या वाढदिवसाच्या जाहिरातीत अजित पवार यांचा फोटो छापल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Girish Mahajan Birthday NEW
BJP News : भाजपच्या लाटेत सपाच्या अडीच हजार उमेदवारांची अनामत रक्कम जप्त ; काँग्रेस, बसपा, आपच्या..

यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि, माजी आमदार सुरेश जैन यांचेही फोटो आहेत. अजित पवार यांच्या फोटोखाली 'जिवाभावाचा माणूस' असा उल्लेख करण्यात आला आहे.

'माझा वाढदिवस साजरा करु नका,' असे निवेदन गिरीश महाजन यांनी प्रसिद्ध केले आहे. "आपण कधी वाढदिवस साजरा करत नाही. यंदा शेतकर्‍यांना अवकाळीचा मोठा फटका बसला आहे. यामुळे मोठी हानी झाली आहे. तर, आता उष्णतेची लाट सुरू असून यामुळे सर्वसामान्य जेरीस आले आहेत. या अनुषंगाने यंदा माझ्या वाढदिवसाला कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन करू नये, कुणी माझ्या वाढदिवसानिमित्त फलकांसह कोणत्याही प्रकारची जाहिरातबाजी करू नये !” असे महाजन यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

Girish Mahajan Birthday NEW
Karnataka Politics : देशातील सर्वात श्रीमंत आमदार कर्नाटकात ; २१० कोट्याधीश विधानसभेत..

"कडाक्याच्या उन्हामुळे सर्वत्र रक्ताचा तुटवडा निर्माण झालेला आहे. यामुळे कुणाला काही कार्यक्रम करायचेच असतील तर उष्णतेची काळजी घेऊन रक्तदान संकलन करावे असे माझे आवाहन आहे. मी यंदाच्या वाढदिवसाला घरी नसून बाहेरगावी असलो तरी आपल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद हे माझ्या सोबत कायम असतील याची मला खात्री आहे.याच्या बळावरच मी आजवर वाटचाल केली आहे," गिरीश महाजन यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com