Nilesh Lanke : '...तर राजीनामा देईल'; खासदार नीलेश लंके भर बैठकीत असं का म्हणाले?

MP Nilesh Lanke Aggressive on Corruption : अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाविकास आणि संनियंत्रण समितीच्या बैठकीत खासदार नीलेश लंके योजनांमधील भ्रष्टाचारावरून चांगलेच आक्रमक झाले.
Nilesh Lanke
Nilesh LankeSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar News : जलजीवन मिशन योजनेतील कामात होत असलेल्या भ्रष्टाचारावर खासदार नीलेश लंके चांगलेच आक्रमक झाले आहेत. या योजनेत भ्रष्टाचार आढळला नाही, तर राजीनामा देईल, असं चॅलेंज खासदार लंकेंनी अधिकाऱ्यांना दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत खासदार लंके यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे अधिकारी देखील गडबडले. जिल्हाधिकारी कार्यालयात वर्षभरानंतर जिल्हाविकास व संनियंत्रण समितीची (दिशा) बैठक झाली.

जलजीनव मिशन कार्यक्रमामध्ये मनमानी पद्धतीने कारभार सुरू असून, पाणी योजनेसाठी कोणतेही पाइप टाकले जात आहे. केवळ 20 टक्केच योजना भ्रष्टाचारमुक्त असू शकतील, टक्केवारीचे काम असेल, तर असेच होणार, अशा शब्दात खासदार लंके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना सुनावले.

Nilesh Lanke
Maharashtra Politics News LIVE UPDATE : मोठी बातमी! जम्मूतील पूँछमध्ये सैन्याचं वाहन दरीत कोसळलं

या योजनेतील कामात भ्रष्टाचार झाल्याचे आरोप होत आहेत. याचा दाखला देत, या योजनेच्या कामात भ्रष्टाचार नसेल, तर राजीनामा देईल, अशी घोषणा देत खासदार नीलेश लंके यांनी अधिकाऱ्यांना चॅलेंज दिले. खासदार लंके यांनी अशी भूमिका घेताच, बैठकीतील अधिकारी देखील गडबडले.

Nilesh Lanke
TOP Ten News - धनंजय मुंडेंना धक्का देणारे ट्विट; बिहार भाजपचा मोठा निर्णय! - वाचा महत्त्वाच्या घडामोडी!

जलजीवन योजनेतील कामाची जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी प्रत्यक्ष लक्ष घालून करावी, अशी मागणी खासदार लंके यांनी केली. या योजनेच्या कामाच्या चौकशीसाठी संसदेत केंद्रीय समितीकडे मागणी केल्याचेही खासदार लंके यांनी सांगितले.

खासदार लंके म्हणाले, "आपण योजनेबद्दल अनेकदा लक्ष वेधले. काम नसताना देखील बिलं अदा झाली आहेत. पूर्ण झालेल्या 210 योजनांपैकी भ्रष्टाचार झाला नाही, असे कोठेही आढळत नाही. हाताने पाइप उकरले जाऊ शकतात". या योजनेसाठी कोट्यवधीचा निधी मिळाल्याचे सांगतो. पण हा निधी, पैसा पाण्यात जात आहे. या योजनेचे जिल्हाधिकारी आणि सीईओ यांनी 'स्पाॅट व्हेरिफिकेशन' करावे, अशी मागणी खासदार लंके यांनी केली.

खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी काही ठिकाणी स्त्रोत नसताना देखील टाक्या उभारल्या जात आहेत. जलवाहिन्या टाकल्या गेल्या आहेत. योजनेमध्ये भलतेच पाइप टाकण्यात आले आहेत. काम झालेले नसताना देखील बिल अदा करण्यात आल्याची बाब गंभीर असल्याकडे देखील लक्ष वेधले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com