नगरसेवकाला सुनावले, कँलेंडर नको, २.७४ कोटींचा हिशेब द्या!

महापालिकेने नगरसेवकांना पाच वर्षात ३४७ कोटींचा विकास निधी दिला आहे.
Corporators cartoon
Corporators cartoonSarkarnama
Published on
Updated on

सिडको : निवडणुकीच्या (NMC) पार्श्वभूमीवर विद्यमान नगरसेवक व इच्छुकांकडून जनसंपर्क मोहीम जोमात आहे. वाण, कँलेंडर वाटप होत आहे. यातील अनेक नगरसेवकांना (Corporation) युवा मतदारांकडून प्रश्नांच्या सरबत्तीला सामोरे जावे लागत आहे. नागरिकांनी एव्हढे कँलेंडर काय करणार?. तुमचे कँलेंडर नको, महापालिकेने (Nashik) दिलेल्या २.७४ कोटींचा विकास निधी कुठे खर्च केला? याचा हिशेब सांगा, अशी विचारणा होत आहे.

Corporators cartoon
देविदास पिंगळेंनी शेतकऱ्यांचे थकलेले २५ लाख रुपये मिळवून दिले!

प्रभागातील नागरी समस्या सोडविण्यासाठी महापालिका दरवर्षी नगरसेवकांना प्रभागासाठी घस-घशीत विकास निधी दिला जातो. हा निधी नेमका कुठे, कशासाठी खर्च केला जातोय? याचा थांगपत्ता नागरिकांना पाच वर्षे झाल्यावर देखील लागत नाही. सध्या मात्र नागरिक विशेषतः युवा वर्ग निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा हिशोब अगदी "डंके की चोट पर" मागताना दिसते आहे.

Corporators cartoon
पक्षांतराचा इन्कार करणाऱ्या भाजपच्या मिनाक्षी पाटील दुसऱ्याच दिवशी शिवसेनेत!

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या विद्यमान नगरसेवक घरोघरी भेटीगाठीवर जोर देत आहेत. कॅलेंडर, माहितीपत्रक वाटप करीत आहेत. परंतु हे करताना त्यांना दरवर्षी मिळालेला विशेष विकास निधी नेमका कोणत्या कामासाठी, कुठे खर्च केला जातो याची माहिती जागरूक नागरिक दारी आलेल्या नगरसेवकांना विचारताना दिसत आहेत. यासंदर्भात सिडको भागात एका नगरसेवकाला अगदी चहाचा आग्रह करीत अर्धा तास बसवून हिशेबासाठी पिच्छा पुरवणारे काही युवक भेटले. त्याची सर्वत्र चर्चा आहे.

या प्रश्नांमुळे नगरिकांच्या संपर्कात नसलेल्या बहुतांश नगरसेवकांची चांगलीच धांदल उडताना दिसत आहे. दरवर्षी नगरसेवक निधी, प्रभाग विकास निधी व विशेष निधी दिला जातो. असे कोट्यवधी रुपये प्रत्येक नगरसेवकांला मिळतात. हा खर्च त्यांच्या शिफारशीनुसार होतो. त्यांनी हा खर्च कोठे नेमका कशासाठी खर्च केला. याची माहिती सर्वसामान्य जनतेला मिळाली पाहिजे. अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. त्याव्यतिरिक्त महासभेमध्ये मंजूर झालेला विकास कामांसाठीचा निधी वेगळाच!

नगरसेवक विशेष निधीतील कामे !

रस्ते, ड्रेनेज, पिण्याची पाईपलाईन, बेंचेस, गार्डन, संगणक खरेदी, अभ्यासिका, योगा वर्ग, रंग रंगोटी, गार्डन मधील खेळणी, ग्रीन जिम, विद्युत पोल, पेव्हर ब्लॉक, कॉन्सन्ट्रेटर अशा आदीं विविध विकास कामांचा समावेश होतो.

महापालिकेत पहिल्या वर्षी ७५ लाख, त्यानंतर सलग चार वर्षे ४२ लाख त्यात शेवटच्या वर्षी बरीच भर म्हणून शेवटच्या वर्षी विशेष निधि सव्वा कोटी असा घसघशीत विकास निधी मिळाला. यामध्ये ५ वर्षात सुमारे २.७४ कोटी निधी मिळाला. शहरातील १२२ नगरसेवकांना ३४७ कोटी निधी मिळाला आहे.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com