पक्षांतराचा इन्कार करणाऱ्या भाजपच्या मिनाक्षी पाटील दुसऱ्याच दिवशी शिवसेनेत!

पक्षांतराचा इन्कार करणाऱ्या भाजपच्या मिनाक्षी पाटील पुन्हा शिवसेनेत!
Corporator Minaxi Patil
Corporator Minaxi PatilSarkarnama

जळगाव : शहरात (Jalgaon) महापालिकेच्या भाजपच्या (BJP) नगरसेवकांचे घाऊक पक्षांतर सुरुच आहे. रोज याबाबत घडामोडी घडतात. चार दिवसांपूर्वीच शिवसेना (Shivsena) प्रवेश करुन मी भाजपमध्येच आहे असा दावा मिनाक्षी पाटील (Minaxi Patil) यांनी केला होता. मात्र सोमवारी त्यांनी पुन्हा यु टर्न घेतला आणि शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे महासभेत तो चर्चेचा विषय ठरला.

Corporator Minaxi Patil
भाजपचा सज्जड दम, तुरूंगवारीची तयारी ठेवावी!

शिवसेना नेते व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजप नेते, माजी मंत्री गिरीश महाजन यांची राज्यभर राजकीय तोडफोडीत तज्ञ अशी प्रतिमा त्यांच्या गृहजिल्हा जळगावमध्येच मोडीत काढली. महापौर निवडणुकीत घाऊक पक्षांतर घडवत सबंध भाजपचे नगरसेवकच शिवसेनेत आणले. त्यानंतर देखील ते सुरुच आहे. वारंवार ते भाजपला धक्का देतात. चार दिवसांपूर्वी भाजपच्या चार नगरसेवकांनी व दोन दिवसांपूर्वी दोन नगरसेवकांना भाजपला रामराम ठोकला होता. भाजपचे नेते त्याबाबत काहीच हस्तक्षेप करू शकले नाही.

Corporator Minaxi Patil
...तर हजारेंच्या समोरच द्राक्ष उत्पादक शेतकरीही उपोषण करणार होते!

तीन दिवसांपूर्वी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत पाळधी येथे सकाळी जाऊन भाजपच्या नगरसेविका मिनाक्षी पाटील यांच्यासह चौघांनी शिवसेनेत प्रवेश केला. मात्र सायंकाळी यु-टर्न घेत मी शिवसेनेत प्रवेश केला नसल्याचा खुलासा मिनाक्षी पाटील यांनी माध्यमांसमोर तसेच सोशल मीडियावरही केला. मात्र पुन्हा त्या शिवसेनेत दाखल झाल्या. त्यामुळे सभागृहनेते ललित कोल्हे आणि मनपा विरोधीपक्षनेते सुनील महाजन यांची खेळी यशस्वी ठरली. दरम्यान, मिनाक्षी पाटील या महापौरांच्या दालनात बसून, महासभेत ऑनलाइन सहभागी झाल्या होत्या.

महापालिकेच्या या महासभेत घणकचरा संकलनाच्या निविदेचा विषय गाडला. ज्यामध्ये ३५ टक्के केंद्र शासन, २३.६६ टक्के राज्य शासन आणि ४१.४४ टक्के महापालिका अशी विभागणी करण्यात येणार आहे. ज्यामध्ये महापालिका १४ व्या वित्त आयोगातून खर्च करणार आहे. हा प्रकल्प पूर्ण न झाल्यास मनपाला दरमहा १ ते १० लाख रुपये दंड बसू शकतो. त्रुटी असलेला डीपीआर हा वेगवेगळ्या संस्थांनी सादर केला होता. ज्यात राज्य शासन, जीवन प्राधिकरण संस्था आदी संस्थांचा समावेश आहे.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com