Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama

Ajit Pawar : लोकसभेला झटका दिलात कंबर मोडली, पण आता...; अजितदादा नेमकं काय म्हणाले?

Ajit Pawar On Majhi Ladki Bahin Yojana sarkarnama : "कोणी खोटा नरेटिव्ह सेट केला तर त्याला बळी पडू नका, लाडकी बहीण योजना ही कायमस्वरूपी चालू ठेवण्यासाठीच सुरु केली आहे. मात्र ती योजना सुरू राहण्यासाठी तुम्ही आमचे बटन दाबले पाहिजे."
Published on

Nashik News, 09 August : तुम्ही लोकसभेमध्ये जो झटका दिलात, तो जोरात लागला, कंबर मोडली, आमची चूक झाली, माफ करा. जो काम करतो तोच चुकतो, असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी लोकसभेवेळी महायुती सरकारचे काही निर्णय चुकल्याची कबुली दिली.

तसेच आगामी विधानसभेसाठी महायुतीला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केलं. ते जनसन्मान यात्रेतील भाषणात बोलत होते. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनसन्मान यात्रा (Jansanman Yatra) नाशिकमधून सुरु झाली आहे. आज शुक्रवारी या यात्रेचा दुसरा दिवस आहे.

या यात्रेदरम्यान केलेल्या भाषणातून अजित पवारांनी (Ajit Pawar) मतदरांना आपणाला मतदान करण्यासाठी साद घातली. शिवाय लोकसभेला मतदारांनी आपणाला झटका दिल्याचं सांगताना त्यांनी मिश्किल टिप्पणी देखील केली. जनसन्मान यात्रेतील भाषणात अजित पवारांनी महायुती सरकारने सुरु केलेल्या सर्व योजना पुढे देखील तशाच चालू राहणार असल्याचं सांगितलं.

मात्र, यासाठी महायुतीच्या उमेदवाराला मतदान करा हे सांगायला ते विसरले नाहीत. लाडकी बहीण योजनेबद्दल बोलताना अजितदादा म्हणाले, "महिला आपल्या कुटुंबाला सक्षम करण्यासाठी काम करतात. त्यांना काही आशा असतात. मी काल रात्री एक बैठक घेतली. सव्वा ते दीड कोटी महिला लाडकी बहिण योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत. अजूनही नोंदणीची कामे सुरू आहेत. काही अडचणी आल्या तर त्यातून आम्ही मार्ग काढत आहोत."

Ajit Pawar
Video Amol Kolhe: अजितदादांचं 'पिंक पॉलिटिक्स' अन् कोल्हेंची फटकेबाजी; 'गुलाबी' पुंगी वाजवून योजनांच्या आवाज काढून...

लॉन्ग टर्म राजकारण

तसंच आम्हाला लॉन्ग टर्म राजकारण करायचे आहे. औट घटकेचे नाही त्यामुळे उद्या या योजनेचा लाभ मिळाला नाहीत तर महिला मला जाब विचारतील. कोणी खोटा नरेटिव्ह सेट केला तर त्याला बळी पडू नका, ही योजना कायमस्वरूपी चालू ठेवण्यासाठीच सुरु केली आहे. मात्र ती योजना सुरू राहण्यासाठी तुम्ही आमचे बटन दाबले पाहिजे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

आता काही झटका देऊ नका

आता काही झटका देऊ नका, लोकसभेला (Lok Sabha) खूप जोराचा शॅाक बसला आहे, असं म्हणत अजितदादांनी लोकसभेच्या निकालाची आठवण करुन दिली. ते म्हणाले, "तुम्ही जो झटका दिलात ती गाडी अद्याप रुळावर आली नाही. आम्ही अडीच वर्षे सत्तेत होतो, त्यानंतर सरकार पडले, कसे पडले सर्वांना माहिती आहे. सत्तेत आलो म्हणून विकास कामांसाठी निधी देता आला.

Ajit Pawar
Narayan Rane Vs Manoj Jarange: ...म्हणून नारायण राणेंनी आपल्या मराठवाडा दौऱ्याची वेळ सांगतानाच जरांगेंचे आभारही मानले!

मी कुणाला दुखवण्यासाठी निर्णय घेतला नाही. मी कामासाठी आलो आहे. आम्ही अभ्यास करणारी माणसे आहोत. हवेत गप्पा मारणारी नाही. केंद्र सरकार आमच्या विचारांचे आहे. लोकसभेमध्ये जो झटका दिला, तो जोरात लागला, कंबर मोडली, आमची चूक झाली, माफ करा. जो काम करतो तोच चुकतो. कांदा निर्यात बंदी करायची नाही, वीज बिल माफ करणे असे निर्णय आम्ही घेतले आहेत."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com