Dr. Amol kolhe Politics: वाद शिवपुत्र संभाजी महानाट्याचा; खासदार अमोल कोल्हे भाजपच्या ‘त्या’ नेत्यावर भरणार खटला!

Dr. Amol Kolhe: MP Amol Kolhe will take action against BJP's Gopal Patil -भाजपच्या नाशिकच्या गोपाळ पाटील यांनी आपले अकार्यक्षमता लपविण्यासाठी शिवपुत्र संभाजी महानाट्य प्रयोग ऐनवेळी रद्द केल्याचा आरोप.
Dr. Amol Kolhe & Gopal Patil
Dr. Amol Kolhe & Gopal PatilSarkarnama
Published on
Updated on

Dr. Amol Kolhe: खासदार अमोल कोल्हे यांच्या बहुचर्चित शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे प्रयोग नाशिकला होणार होते. ऐनवेळी आयोजक असलेल्या भाजप नेत्याला हे प्रयोग झेपले नाही. त्यामुळे त्यांनी परस्पर हे प्रयोग रद्द केल्याने राजकीय वाद उफाळला आहे.

भारतीय जनता पक्षाचे गोपाळ पाटील यांनी शिवपुत्र संभाजी महानाट्य प्रयोग आयोजित केले होते. मात्र त्याची व्यवस्था न झेपल्याने त्यांनी ते ऐनवेळी रद्द केले. त्यासाठी डॉ अमोल कोल्हे यांच्या राजकीय भूमिकेची ढाल करीत आरोप केले. या राजकीय आरोपांमुळे नवा वाद उभा राहिला आहे.

Dr. Amol Kolhe & Gopal Patil
Mangesh Chavan Politics: चाळीसगावच्या विहिरी॑त मुरले भ्रष्टाचाराचे पाणी, भाजप आमदाराच्या कडक भूमिकेमुळे अधिकारी गोत्यात!

खासदार अमोल कोल्हे यांनी याबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आयोजक हे भाजपचे ज्येष्ठ नेते असल्याचे म्हणून घेतात. शिवपुत्र संभाजी महानाट्य ही कला आहे. त्यात कोणतेही राजकारण नसते. हा विषय मराठी माणूस आणि छत्रपती संभाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्यांसाठी भाविक विषय आहे. त्याला आयोजक पाटील यांनी राजकीय अँगल देण्याचा केविलवाना प्रयत्न केला आहे.

Dr. Amol Kolhe & Gopal Patil
Bhausaheb Thorat Sugar Factory : काँग्रेसच्या थोरातांचा कारखाना बिनविरोध झाला; भाजप मंत्री विखेंशी राजकीय 'सेटलमेंट'च्या चर्चेला तोंड फुटलं!

खासदार कोल्हे यांनी वक्फ विधेयकाच्या बाजूने संसदेत मतदान केले. पहेलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत वेगळी प्रतिक्रिया व्यक्त केली. मुळे हिंदुत्ववाद्यांच्या भावना दुखावल्या. प्रयोग रद्द करावे लागले असा दावा, गोपाळ पाटील यांनी केला होता.

या दाव्याची पूर्ण चिरफाड खासदार कोल्हे यांनी केली. वक्फ विधेयकावर ३ एप्रिलला मतदान झाले होते. पहेलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत पुणे पत्रकार संघाच्या कार्यक्रमात रात्री आठ वाजता भाषण केले होते. क्रिकेटचे देशभर आणि देशाच्या हिताच्या दृष्टीने कौतुक झाले होते. आयोजकांनी प्रयोगाबाबतची घोषणा मात्र संध्याकाळी सातला केली. त्यामुळे आयोजक आपले अपयश लपविण्यासाठी भाजपची राजकीय ढाल करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र आहे.

भाजपचे पाटील यांनी या प्रयोगासाठी किती तिकिटांची विक्री केली, किती पैसे जमा केले, कोणती व्यवस्था केली, याबाबत काहीही माहिती दिलेली नाही. नाट्यप्रयोगासाठी रीतसर कायदेशीर करार करण्यात आला आहे. त्यातील पैसे अदा करण्याच्या अटींचा भंग केला आहे. अपयश आणि फसवणूक टाळण्यासाठी त्यांनी राजकारणाचा आधार घेतल्याचा आक्षेप खासदार कोल्हे यांनी केला.

महानाट्याचे प्रयोग रद्द करावे लागले. याबाबत असंख्य नाशिककरांच्या भावना दुखावलेले आहेत. आयोजकांनी आपली अकार्यक्षमता लपविण्यासाठी व खोटे आरोप करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याची किंमत त्यांना मोजावी लागेल. कलाकारांनी तालीम केली होती, व्यासपीठ उभारण्यात आले होते, कलाकार दाखल झाले होते. असताना ही दुर्दैवी बाब घडल्याने चर्चेचा विषय ठरला आहे.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com