Mangesh Chavan Politics: चाळीसगावच्या विहिरी॑त मुरले भ्रष्टाचाराचे पाणी, भाजप आमदाराच्या कडक भूमिकेमुळे अधिकारी गोत्यात!

Mangesh Chavan; Chalisgaon well corruption, Panchayat Samiti in trouble after BJP MLA Mangesh Chavan complaint -भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्या तक्रारीनंतर पंचायत समिती अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
Mangesh-Chavan.jpg
Mangesh-Chavan.jpgSarkarnama
Published on
Updated on

Mangesh Chavan News: विकास कामे करण्यात आघाडीवर असणारे भाजप आमदार मंगेश चव्हाण सध्या अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचारामुळे आपल्याच मतदारसंघातील प्रशासनावर संतापले आहेत. त्यांनी हा संताप थेट पोलिसांकडेच व्यक्त केला आहे. त्यामुळे अनेक अधिकारी गोत्यात येण्याची चिन्हे आहेत.

चाळीसगाव मतदारसंघात साडेचार हजाराहून अधिक विहिरी मंजूर करण्यात आल्या. त्यासाठी भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी आपल्या कौशल्याचा पुरेपूर वापर केल्याचा दावा केला होता. तर आता हा दावाच शेतकऱ्यांच्या प्रशासन आणि अधिकाऱ्यांवरील आरोपांमुळे वादात सापडला आहे.

Mangesh-Chavan.jpg
Arun Jagtap : नगरकरांचे 'काका', माजी आमदार अरुण जगताप यांचे निधन

पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी या विहिरी मंजूर करताना शेतकऱ्यांकडून हजारो रुपयांची वसुली केल्याच्या तक्रारी आहेत. शेतकऱ्यांनी थेट आमदारांकडेच याबाबत तक्रारी केल्या. त्यामुळे संतापलेल्या आमदार मंगेश चव्हाण यांनी शेतकऱ्यांना घेऊन थेट पोलीस ठाणे गाठले होते.

Mangesh-Chavan.jpg
Bhausaheb Thorat Sugar Factory : काँग्रेसच्या थोरातांचा कारखाना बिनविरोध झाला; भाजप मंत्री विखेंशी राजकीय 'सेटलमेंट'च्या चर्चेला तोंड फुटलं!

संबंधित पैसे घेणाऱ्या पंचायत समितीचे अधिकाऱ्यांवर दोन दिवसात कारवाई करण्याचा इशारा आमदार चव्हाण यांनी पोलिसांना दिला होता. मात्र आमदारांनी दिलेली मुदत संपल्यावरही अपवाद वगळता शेतकरी तक्रारीसाठी पुढे आलेले नाहीत. त्यामुळे पोलीस यंत्रणाही बुचकाळ्यात पडली आहे.

या संदर्भात पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्याकडे चार शेतकऱ्यांनी तक्रार केली आहे. या तक्रारी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अख्तर शेख यांच्याकडे पाठविण्यात आले आहे. पोलिसांना आता पंचायत समितीच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.

शेतकऱ्यांच्या तक्रारी आणि आमदार चव्हाण यांनी घेतलेली आक्रमक भूमिका यामुळे पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांची पाचावर धारण बसली आहे. संदर्भात गटविकास अधिकाऱ्यांनी देखील अप्रत्यक्षरीत्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून पैसे घेतल्याचे मान्य केले आहे. त्यामुळे चार ते पाच अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे.

चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात मंजूर झालेली घरकुले आणि विहिरी हा आता वादाचा विषय बनला आहे. घरकूल प्रकरणातही तक्रारी आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या विहिरींबाबत भ्रष्टाचार आणि राजकारण दोन्हींचे पाणी मुरते आहे. तक्रारी करणारे शेतकरी हे राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित आहेत. आधीच विहिरी असतानाही शासनाच्या अनुदानासाठी नव्या विहिरी खोदण्याचे त्यांनी कागदावर दाखवले आहे. त्यामुळेच आता पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांबरोबरच या शेतकऱ्यांवरही कारवाई होणार का याची चर्चा जोर धरू लागली आहे

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com