Amol Mitkari News: आंबेडकरांचे अनुयायी गरीब असतील लाचार नाहीत!

राज्य सरकारच्या शंभर रुपयांत आनंदाचा शीधा योजनेच्या वितरणातील त्रुटीवर मिटकरी यांनी ठेवले बोट.
Amol Mitkari
Amol MitkariSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : दिवाळीला आनंदाचा शीधा देण्याची घोषणा केली होती, तो मिळाला का?. तुमचे मंत्री (Ministers) म्हणतात तुलसीविवाहापर्यंत दिवाळी (Diwali) असते. आता डॉ. आंबेडकर जयंतीला (Dr. Babasaheb Ambedkar) शीधा देण्याची घोषणा केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी गरीब असतील, मात्र लाचार नाहीत, याची सरकारने (Maharashtra Government) नोंद घ्यावी, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले. (what action taken by Government on insulting statement on our great leaders)

Amol Mitkari
Nashik News; `कसबा` विजयाने शिवसेना काँग्रेसच्या दारात!

राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत आमदार मिटकरी यांनी भाग घेतला. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या अनेक योजना व कामकाजाचा समाचार घेतला. या सरकारच्या कारकिर्दीत शीळे अन्न खाल्ल्याने गाई मृत्यूमुखी पडल्या. महाविकास आघाडीच्या कारकिर्दीत अशी घटना घडली असती तर किती अपप्रचार केला असता, असा प्रश्न त्यांनी केला. तालीका सभापती नरेंद्र दराडे होते.

Amol Mitkari
ACB Trap: मोठा मासा जाळ्यात अडकला, `पीडब्ल्यूडी`चा अभियंता अटकेत

श्री. मिटकरी म्हणाले, राज्यपालांचे अभिभाषण म्हणजे राज्य शासनाची स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा प्रकार आहे. पंतप्रधान देहू, आळंदीला आले, त्यांच्या भाषणाची सुरवात तरी मराठीतून होती, मात्र मराठी गौरव दिवस असताना राज्यपालांच्या भाषणात मराठीचा साधा उल्लेख देखील नव्हता. महाविकास आघाडीच्या काळात पुर्णत्वास गेलेल्या समृद्धी महामार्ग, मुंबई, पुणे, नागपूर शहरातील मेट्रो या प्रकल्पांचे श्रेय सध्याचे सरकार घेत आहे.

यापुर्वीच्या राज्यपालांनी राष्ट्रपुरूषांचा अवमान केला. त्या राज्यपालांचा आपण मंत्रीमंडळाच्या बैठकीत अभिनंदनाचा ठराव करता. एव्हढेच प्रेम असेल तर वानखेडे स्टेडीयममध्ये सत्कार का घेतला नाही. त्यांच्या विरोधात जनता रस्त्यावर उतरली होती याचा विसर पडला की काय?. एक बागेश्वर महाराज आले, त्यांनी संत तुकाराम महाराजांचा अवमान केला, त्याबाबत काय कारवाई केली?, असा प्रश्न त्यांनी केला.

Amol Mitkari
Nashik News; प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना काँग्रेस नेत्यांचे थेट आव्हान!

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे `कॅग`ने कौतुक केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सदस्यांना पाच कोटींचा निधी देऊन त्यातील एक कोटी कोरोनासाठी खर्च करण्याची परवानगी दिली. आजच्या सत्ताधाऱ्यांनी मात्र आपला निधी पीएम केअर फंडला दिला. जुनी पेन्शन योजनेविषयी काहीही चर्चा नाही. मात्र सगळे आलबेल आहे, असे चित्र रंगवण्याचा हा सरकारचा प्रयत्न आहे.

कांदा उत्पादकांच्या प्रश्नाकडे श्री. मिटकरी यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. ते म्हणाले, शिंदे-फडणवीस सरकार म्हणजे जणु काही रामराज्य आले असे सांगत आहात. कांदा प्रश्न तीव्र आहे. शेतेकरी संकटात आहे, त्याला काहीही दिलासा नाही. यापूर्वी या विषयावर लक्षवेधी आली असता, (कै) गणपतराव देशमुख मंत्री होते. चर्चा थांबवून ते दिल्लीला गेले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांना बरोबर घेऊन पंतप्रधानांकडे गेले आणि हा प्रश्न सोडवला. आज असे काहीच होताना दिसत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com