नाशिक : निफाड (Niphad) साखर कारखान्याच्या जागेवर होणारा मल्टिमॉडेल लॉजेस्टिक पार्क (Multimodel ligistic park) शंभर टक्के केंद्र सरकारच्या (Centre Government) अनुदानातून होणार आहे, असे असूनही निफाडचे आमदार ड्रायपोर्ट गुंडाळला, असे सांगून जनतेची दिशाभूल करीत आहे, असा आरोप केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ . भारती पवार (Dr. Bharti Pawar) यांनी केला. (Multimodel ligistic park is 100 percent centre finance Project)
केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार यांनी बुधवारी जिल्ह्यातील प्रश्नाबाबत बैठक घेतली. यावेळी विविध योजनांचा आढावा घेण्यात आला.
या बैठकीनंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. राज्यातील महाविकास आघाडी सरकार सत्तेतून पायउतार झाल्यापासून नाशिकचे प्रकल्प मार्गी लागू लागले आहेत, फायली गतिमान होऊ लागल्या आहेत. मल्टिमॉडेल लॉजेस्टिक पार्क हा केंद्र शासनाचा महत्त्वाकाक्षी प्रकल्प असेल, असे त्यांनी सांगितले.
निफाड साखर कारखान्याच्या जागेवरील प्रस्तावित ड्रायपोर्टच्या जागेवरच हा प्रकल्प होणार आहे. त्यामुळे जागेचा विषय मिटला आहे. टायटल क्लिअर जागेसाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात दोन वर्षे वाया गेली. आता जागेचा विषय मार्गी लागल्याने रस्ते, रेल्वेच्या अतिरिक्त सुविधांची सोय असलेल्या या प्रकल्पासाठी सुधारित सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) करण्याचे काम सुरू आहे.
आघाडी सरकारने दोन वर्षांत साधे जागेचे टायटल क्लिअरन्सचे काम केले नाही. जागा मिळवून देता आली नाही, त्यामुळे एक वेळ अशी आली होती, की पर्यायी खासगी जागेचा विचार सुरू झाला होता. निधी मिळायला लागले काम होऊ लागल्याचा दावा डॉ. पवार यांनी केला.
माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या राज्यातील प्रकल्प गुजरातला पळवले जात असल्याच्या आरोपाला उत्तर देताना डॉ . पवार यांनी हा केवळ दिशाभूल करण्याचा प्रकार आहे. उलट प्रत्येक जिल्ह्याला न्याय मिळू लागला आहे, असे त्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.