Nashik News : `शासन आपल्या दारी` या शासकीय कार्यक्रमाला आज शहरात गर्दी झाली होती. यावेळी विविध योजनांची माहिती देण्यात आली, मात्र यावेळी भाषण करताना केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांना काँग्रेस नेते राहूल गांधी यांच्यावर टिका केली. त्यामुळे शासकीय कार्यक्रमात राजकीय भाषणाची किनार या कार्यक्रमाला लाभली. (Centre minster of state Dr. Bharti Pawar appriciate BJP Schemes of Centre & State Government)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत शासन तुमच्या दारी हा कार्यक्रम नाशिकला (Nashik) झाला. यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharti Pawar)) यांसह नऊ मंत्री उपस्थित होते.
यावेळी डॉ. भारती म्हणाल्या, अजितदादा यांनी आज वंदे भारत रेल्वे गाडीने प्रवास केला. यानिमित्ताने तुम्हाला देशातील एका उत्तम रेल्वेचा अनुभव आला. अशा सव्वीस रेल्वेगाड्या देशात धावत आहेत. अशा प्रकारे भारताची भरारी सुरू आहे. जगभर त्याचे कौतूक होत आहे.
अशा प्रकारे विविध क्षेत्रात उत्तम काम केंद्र सरकार तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. मात्र काँग्रेस नेते राहून गांधी हे मात्र अमेरिकेत जाऊन भारतातील लोकशाही धोक्यात असल्याचे सांगतात. हे चुकीचे आहे. देशात उत्तम काम होत आहे. मात्र विरोधी पक्ष देशाची प्रतीमा बिघडवण्याचा प्रयत्न करतात, अशी राजकीय टिका त्यांनी केली.
यावेळी राज्यमंत्री डॉ. पवार यांनी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती देत, जनतेला दिलासा देण्याचे काम सरकार उत्तम प्रकारे करीत आहे. त्याचे प्रतीक येथे जमलेल्या गर्दीतून येते. २०१४ पूर्वी देशात महिला बचत गटांची संख्या काही हजारांत होती. आज ती संख्या नऊ कोटी कोटींच्या पुढे आहे. पूर्वी आम्हाला पन्नास हजार रुपये कर्ज मिळत होते. आता वीस लाख मिळते आहे. महिला सबलीकरणाचे उत्तम काम सुरू आहे, याचे हे द्योतक आहे, असे सांगितले.
यावेळी छगन भुजबळ, गिरीश महाजन, पालकमंत्री दादा भुसे, उदय सामंत, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे, अनील पाटील, खासदार हेमंत गोडसे विविध आमदार उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.