Ajit Pawar PC : मी अन॒ प्रफुल्ल पटेल १८ जुलैला ‘एनडीए’च्या बैठकीला जाणार,पंतप्रधानांनाही भेटणार; अजित पवारांनी केली लाईन क्लिअर

अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस ही एनडीएत सामील झालेली आहे, त्यामुळे ते एनडीएच्या बैठकीला हजेरी लावणार आहेत.
Ajit Pawar-Praful Patel
Ajit Pawar-Praful Patel Sarkarnama
Published on
Updated on

Nashik News : शिवसेना-भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये सहभागी झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे येत्या १८ जुलै रोजी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) बैठकीला जाणार आहोत. त्याच वेळी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहेत. (Ajit Pawar, Praful Patel will go to NDA meeting on July 18)

अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) ३५ ते ४० आमदार हे भाजपसोबत गेले आहेत. पवार हे उपमुख्यमंत्री झाले असून त्यांच्यासोबत आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. अजितदादांच्या गटाला अर्थ व नियोजन, सहकार, कृषी, अन्न व नागरी पुरवठा, महिला व बालविकास, क्रीडा, अन्न व औषध प्रशासन, वैद्यकीय शिक्षण, मदत आणि पुनर्वसन अशी चांगली खाती मिळालेली आहेत. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस ही एनडीएत (NDA) सामील झालेली आहे, त्यामुळे ते एनडीएच्या बैठकीला हजेरी लावणार आहेत.

Ajit Pawar-Praful Patel
Maharashtra Politic's: सुनिल शेळके, संग्राम जगताप, यशवंत माने, कोकाटेंना पवारांचा दणका; 12 आमदारांना पाठवली नोटीस

याबाबत अजित पवार म्हणाले की, येत्या १८ जुलै रोजी मी आणि प्रफुल्ल पटेल राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) बैठकीला जाणार आहेात. त्यावेळी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याचा प्रयत्न करणार आहे. काही दिवसांपूर्वी मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटलो होतो, त्यावेळी त्यांनाही राज्यातील पावसाची परिस्थिती सांगितली होती. त्यावेळी त्यांनी पंतप्रधानांशी भेट घडवून आणू, असे सांगितले होते.

Ajit Pawar-Praful Patel
Cabinet Expansion : मुख्यमंत्र्यांनी भाजप हायकमांडचा 'तो' आदेश अर्धा पाळला; त्या पाचपैकी दोन मंत्र्यांची खाती बदलली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना १८ जुलै रोजी भेटल्यानंतर त्यांच्या कानावर राज्यातील कमी पावसाची परिस्थिती घालणार आहे. नैसर्गिक आपत्ती निवारण समितीचे अध्यक्ष बहुधा अमित शहा आहेत. मला नक्की माहिती नाही; पण माझा अंदाज आहे. ज्यांच्याकडे याबाबतची जबाबदारी असेल त्यांना भेटू, असेही अजितदादांनी स्पष्ट केले.

Ajit Pawar-Praful Patel
Pandharpur-Mangalveda Politic's : अजित पवारांच्या भाजप पाठिंब्याचे आमदार समाधान आवताडेंना ‘टॉनिक’...

पवार म्हणाले की, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी १२ तारखेला कार्यक्रम घेतला आहे. नाशिक-मुंबई रस्ता खूप खराब झालेला आहे. येवला रस्ताही खराब झालेला आहे, त्यामुळे त्याची दुरुस्ती व्हावी, अशी मागणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, नितीन पवार, नरहरी झिरवाळ, हिरामण सातकर, सरोज अहिरे या सर्वांची आहे. त्यामुळे सर्वांना घेऊन पुढे जाण्याचा आमचा प्रयत्न आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com