Dindori Loksabha 2024 : दिंडोरी लोकसभा मतदार संघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा झाली. या सभेने मतदारांवर पुन्हा एकदा विकासाचा मुद्दा प्रभावी ठरला. त्यामुळे भाजपचा विजय सोपा झाल्याचे बोलले जात आहे. दिंडोरी लोकसभा मतदार संघात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार होत्या. त्यांचा सामना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भास्कर भगरे यांच्याशी झाला.
या निवडणुकीत नकारात्मक मुद्द्यांचा प्रचंड गाजावाजा झाला. परंतु शेवटी मतदार विकासालाच पसंती देतील, असा विश्वास डॉ. पवार यांनी व्यक्त केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराबाबत डॉ. पवार यांनी 'सरकारनामा'ला माहिती दिली. त्या म्हणाल्या सायलेंट वोटर हा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे. त्याच्याकडून विकासाला पसंती देण्यात आली. आम्हीही निवडणूक आणि प्रचार विकास कामांच्या मुद्द्यांवरच लढलो. त्याला नक्की प्रतिसाद मिळेल.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा
या निवडणुकीत नकारात्मक अमुद्द्यांचा विरोधकांनी खूप गाजावाजा केला. मात्र गेल्या पाच वर्षात भाजपच्या (Bjp) माध्यमातून मतदार संघात झालेला विकास हा सगळ्यांच्या डोळ्यापुढे आहे. या विकासाला विरोधकांकडे उत्तर नव्हते. त्यामुळे ही निवडणूक वेगळ्या दिशेने नेण्याचे विरोधकांचे प्रयत्न होते. त्यात ते कधीही यशस्वी होणार नाही, असे मतदारसंघात फिरल्यानंतर मला जाणवत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची पिंपळगाव बसवंत येथे सभा झाली. केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांची सभा चांदवड येथे झाली. पंकजा मुंडे यांनी सायखेडा येथे सभा घेतली. या तिन्ही सभांनी मतदारसंघातील वातावरण भाजपसाठी अनुकूल केले. शेवटच्या पाच दिवसांमध्ये महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता परिश्रमपूर्वक मतदारांपर्यंत पोहोचला. त्यामुळे दिंडोरी मतदार संघात यंदा पुन्हा एकदा भाजपचा उमेदवार लोकसभेत जाईल. असा माझा विश्वास आहे, असे डॉ पवार यांनी सांगितले.
(Edited by : Chaitanya Machale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.