Nandurbar Lok Sabha election 2024: हिना गावित यांच्या घराणेशाहीने भाजपची होणार कोंडी?

Dr. Hina Gavit Vs Congress News: भाजपने नवीन चेहऱ्याला संधी द्यावी अशी मागणी होती. मात्र ती फोल ठरली आहे. निवडणुकीत डॉ. गावित यांना पक्षातील नाराज नेत्यांची कितपत साथ मिळेल हा उत्सुकतेचा विषय आहे.
Dr. Heena Gavit
Dr. Heena GavitSarkarnama
Published on
Updated on

Nandurbar: नंदुरबार मतदारसंघात भाजपने डॉ. हिना गावित (Dr. Hina Gavit) यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने गावित यांच्या विरोधात गोवल पाडवी हा फ्रेश चेहरा दिला आहे. मात्र डॉ. गावित यांना काँग्रेसच्या आधी स्वपक्षातील विरोधकांचीच लढावे लागणार आहे.

भाजप सातत्याने विरोधकांवर घराणेशाहीचा आरोप करते. नंदुरबार (Nandurbar Lok Sabha election 2024) येथे मात्र हा आरोप त्यांनाच अडचणीत आणणारा ठरला आहे. मंत्री, खासदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समिती इथपासून तर सर्व संस्था आणि पदे डॉ. विजयकुमार गावित यांच्या कुटुंबात केंद्रीत झाले आहेत. या घराणेशाहीला भाजपमधील अन्य नेते देखील कंटाळले आहेत. किमान यंदाच्या लोकसभा निवडणुकीत तरी घराणेशाहीतून सुटका होईल अशी अपेक्षा होती. भाजपने नवीन चेहऱ्याला संधी द्यावी अशी मागणी होती. मात्र ती फोल ठरली आहे. त्यामुळे या निवडणुकीत डॉ. गावित यांना पक्षातील नाराज नेत्यांची कितपत साथ मिळेल हा उत्सुकतेचा विषय आहे.

काँग्रेसने यंदा सुरुवातीपासून भाजपला आव्हान देण्यासाठी त्यांच्यातील नाराजीचा लाभ कसा घ्यायचा हे धोरण आखले होते. त्यामुळे भाजपची उमेदवारी जाहीर होईपर्यंत काँग्रेसने उमेदवार जाहीर केला नव्हता. काँग्रेसने दुसऱ्या टप्प्यात येथे उमेदवार जाहीर केला.

नंदुरबारमध्ये काँग्रेसकडे विविध उमेदवार यंदा स्पर्धेत होते. यामध्ये माजी मंत्री स्वरूप सिंग नाईक यांच्या स्नुषा रजनी नाईक, सीमा वळवी, माजी मंत्री के. सी. पाडवी ही नावे आघाडीवर होती. यात आपला निभाव लागणार नाही, याची कल्पना आल्याने राजेश पाडवी यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केला होता. ही पार्श्वभूमी असताना व माजी मंत्री के. सी. पाडवी यांचे नाव चर्चेत होते. मात्र अनपेक्षित पणे त्यांचे चिरंजीव गोवाल पाडवी या तरुणाला संधी दिली आहे. त्यामुळे ही निवडणूक अतिशय रंजक होण्याची चिन्हे आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Dr. Heena Gavit
Kolhe Vs Adhalrao Patil: आढळरावांचे कोल्हेंना जशास तसे उत्तर; संधीसाधू अन् गायब खासदार

गोवाल पाडवी हा फ्रेश चेहरा असल्याने त्याला काँग्रेसमध्ये फारसा विरोध नाही. विरोधी पक्ष भाजपच्या नाराज आणि त्यांनाही त्यांच्याविषयी तक्रारी नाहीत. ही काँग्रेसच्या दृष्टीने जमेची बाजू आहे. भारतीय जनता पक्षात नाराज नेत्यांची मोठी संख्या आहे. त्याला प्रामुख्याने आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित यांची घराणेशाही कारणीभूत आहे.

जोपर्यंत मंत्री डॉ. गावित असतील तोवर भाजपमधील अन्य नेत्यांची डाळ शिजण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे सर्वप्रथम या नेत्यांना गावित यांचा बुरुज खिळखिळा करावा लागणार आहे. हे राजकीय सत्य असल्याने पडद्यामागून स्व पक्षातील अनेक नेत्यांचा गावित यांना छुपा विरोध होण्याची पूर्ण शक्यता आहे. हिना गावित यांच्या उमेदवारीला या नेत्यांनी त्यामुळेच विरोध केला होता. या सगळ्यांचे 'उमेदवार बदला' ही एकच मागणी होती. ती प्रत्यक्षात आलेले नाही. त्यामुळे भाजप यांची नाराजी कशी दूर करते हे महत्त्वाचे ठरेल.

शिवसेना शिंदे गट हा महायुतीचा घटक आहे मात्र नंदुरबारमध्ये चंद्रकांत रघुवंशी हे शिंदे गटाचे नेते आहेत. त्यांना सातत्याने साईड ट्रॅक करण्याचा प्रयत्न विजयकुमार गावित यांनी केला आहे. याशिवाय दीपक पाटील, अभिजीत पाटील, माजी मंत्री जयकुमार रावल आणि गावित कुटुंबातीलच आमदार राजेंद्र गावित हे सर्व भाजपचे नेते विजयकुमार गावित यांच्या कुटुंबापासून अलिप्त आहेत.

राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे अनिल पाटील यांना मंत्रिमंडळात असताना मिळाले. त्यानंतरच्या घडामोडींत डॉ. गावित यांच्याकडून नंदुरबारचा पालकमंत्रीपदाचा कारभार काढून घेण्यात आला. तो अनिल पाटील यांना देण्यात आला. अनिल पाटील पालकमंत्री झाल्यावर त्यांनी विजयकुमार गावित यांच्या विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला आहे. ही मोट आता लोकसभा निवडणुकीत काय भूमिका बजावते हा मोठा विषय आहे. त्यामुळे डॉ. हिना गावित यांना विरोधकांना आधी भाजपमधील नाराज मंडळींना हाताळावे लागणार आहे.

Edited by: Mangesh Mahale

Dr. Heena Gavit
Beed News: बीडमध्ये नवीन ट्विस्ट; सोनवणे, मेटेंच्या उमेदवारीचा वाटेत 'निष्ठावंतांचा' स्पीड ब्रेकर

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com