Neelam Gorhe Politics: नीलम गोऱ्हे यांना दिलेले पैसे कसे केले वसुल? नाशिकच्या नेत्याने वापरला 'हा' फंडा

Neelam Gorhe money recovery case: नाशिकच्या माजी महापौर विनायक पांडे यांनी नीलम गोऱ्हे यांनी पैसे घेतल्याचा आरोप केला आहे.
Neelam Gorhe funding issue
Neelam Gorhe funding issueSarkarnama
Published on
Updated on

Neelam Gorhe News: विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना नेत्यांवर मर्सिडीज कार घेतल्याचा आरोप केला होता. त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. समाज माध्यमांवर गोऱ्हे यांच्यावर टीकेचा वर्षाव झाला आहे.

या संदर्भात नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे यांनी नीलम गोऱ्हे यांनी आपल्याकडून विधानसभेच्या उमेदवारीसाठी पैसे घेतले होते, असा आरोप केला. या आरोपाने एकच खळबळ उडाली आहे. आपण ४३ वर्ष शिवसेनेत सक्रिय आहोत. आपल्याकडून शिवसेना नेत्यांनी एक रुपयाही घेतलेला नाही, असे स्पष्टीकरण माजी महापौर पांडे यांनी दिले.

Neelam Gorhe funding issue
Manikrao Kokate Politics: माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदावरील लटकती तलवार कायम, आज होणार फैसला!

या संदर्भात शिवसेना नेते संजय राऊत यांनी देखील श्री पांडे यांचा संदर्भ दिला होता. नीलम गोऱ्हे यांनी पांडे यांच्याकडून पैसे घेतले होते. ते त्यांनी कसे परत मिळवले हे त्यांना विचारा, असे राऊत म्हणाले होते. त्यामुळे याबाबत अनेकांना उत्सुकता वाढली.

Neelam Gorhe funding issue
Kokate Vs Dighole वाद इतक्यातच मिटणार नाही; कोकाटेंविरोधात दिघोळेंची मुलगी मैदानात

त्यामुळे माजी महापौर पांडे यांनी आपले पैसे कसे परत मिळवले?, याची अनेकांना उत्सुकता आहे. याबाबत स्वतः पांडे यांनी खुलासा केला आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंधरा दिवसांनी श्री पांडे यांनी श्रीमती गोऱ्हे यांच्याशी आपण वारंवार संपर्क केला. मात्र त्यांनी दूरध्वनी घेतला नाही.

त्यानंतर ते स्वतः शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांसमवेत गोऱ्हे यांना भेटले. त्यांनी त्यांना उमेदवारी मिळाली नसल्याने पैसे परत देण्याची विनंती केली. मात्र श्रीमती गोऱ्हे यांच्याकडून त्यांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी याबाबत आम्ही पत्रकार परिषद घेऊन सर्वकाही जनतेपुढे मांडू. त्यानंतर पत्रकारांना याबाबतचे खुलासे आणि पुरावे देखील देऊ, असे सांगितले.

त्यानंतर मात्र श्रीमती गोऱ्हे यांनी त्यांना मुंबईत बोलून ड्रायव्हर मार्फत पैसे परत केले. मात्र ते पैसे पूर्ण नव्हते. याचा अर्थ ते पैसे श्रीमती गोऱ्हे यांच्याकडेच होते, असा दावा श्री. पांडे यांनी केला.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कधीही आपल्याकडून एक रुपयाही मागितलेला नाही. मी सात वर्ष महानगर प्रमुख, सात वर्ष जिल्हाप्रमुख, उपमहापौर आणि महापौर अशा विविध पदांवर शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून संधी मला मिळाली. सामान्य आणि प्रामाणिक कार्यकर्त्याला प्रोत्साहन देण्याचे शिवसेनेचे धोरण राहिले आहे. अशा शिवसेनेला बदनाम करण्याचे कारस्थान श्रीमती गोऱ्हे यांनी केले. याची खंत वाटते, असे श्री. पांडे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com