Dr Radhakrishna Vikhe Patil: विखे पाटलांचा रोहित पवारांना टोमणा, काळ्या काचा खाली घेतल्या असत्या तर?

Dr Radhakrishna Vicky Patil; vikhe Patil replied to Rohit Pawar on Lamborghini-विखे पाटलांनी मंत्रालयातील लोम्बार्गिनी कार बाबतच्या आरोपाला दिले उत्तर
Rohit Pawar & Dr Radhakrishna Vikhe Patil
Rohit Pawar & Dr Radhakrishna Vikhe PatilSarkarnama
Published on
Updated on

Dr Vikhe Patil News: गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी महसूल मंत्र्यांवर आरोप केला होता. मंत्रालयात लॅम्बोर्गिनी गाडी कोणाकडे आली होती? याविषयी त्यांनी सूचक विधान केले होते.

आमदार रोहित पवार यांच्या आरोप नंतर महसूल मंत्री डॉ विखे पाटील चर्चेत आले होते. मंत्रालयात लॅम्बोर्गिनी कार आली होती. या कारची कोणीही तपासणी केली नाही. ती थेट मंत्रालयाच्या पोर्चमध्ये गेली. या कारमधून मोठा बांधकाम व्यवसायिक कोणत्या मजल्यावर गेला आणि त्याचे काय काम होते? असे सूचक प्रश्न आमदार पवार यांनी केले होते.

Rohit Pawar & Dr Radhakrishna Vikhe Patil
AIMIM Politics: चर्चेत राहण्यासाठी गोळीबाराचा स्टंट आला अंगलट, मालेगावच्या ‘फिटर’ला कोठडीची हवा!

त्यामुळे संबंधित बांधकाम व्यवसायिक मंत्रालयात महसूल मंत्री यांना भेटल्याची चर्चा सुरू झाली होती. ही भेट कशासाठी झाली? याबाबत विविध शंका व्यक्त केल्या जात होत्या. त्याला आता माजी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उत्तर दिले आहे.

Rohit Pawar & Dr Radhakrishna Vikhe Patil
Girish Mahajan Politics: भाजप नेत्यांचे थेट मंत्री गिरीश महाजन यांना साकडे.... काय आहे प्रकरण!

ते म्हणाले, आमदार पवार यांच्या आरोपानुसार लॅम्बोर्गिनी गाडी माझ्याकडे आली होती, अशी चर्चा झाली. मात्र माझ्या आजपर्यंतच्या जीवनात असे कधीही झाले नाही. त्यामुळे माहिती घेऊन आमदार पवार बोलले असते, तर बरे झाले असते.

मंत्रालयात अनेक गाड्या येतात. त्यामुळे अमुक गाडी माझ्याकडेच आली, हे कसे? सांगता येईल. या संदर्भात आधी चौकशी करायला हवी होती. त्या गाडीला काळ्या काचा होत्या, असे आमदार पवार म्हणत होते. काचा खाली करून बघायला पाहिजे होत्या. कदाचित काचा खाली केल्या असत्या तर गाडीत आमदार रोहित पवार हेच दिसले असते, असा टोमणा विखे पाटील यांनी मारला.

गेला आठवड्यात आमदार पवार यांनी संबंधित लॅम्बोर्गिनी गाडीबद्दल आरोप केला होता. या आरोपामुळे खळबळ उडाली होती. माध्यमांमध्ये त्याची बरीच चर्चा झाली. ही गाडी महसूल मंत्र्यांकडे गेली होती असाही दावा केला जात होता.

या प्रकरणावरून सुरू झालेल्या राजकारणावर आज मंत्री विखे पाटील यांनी जोरदार बॅटिंग केली आहे. आता हा चेंडू पुन्हा एकदा आमदार रोहित पवार यांच्याकडे भिरकावला गेला आहे. आमदार रोहित पवार त्याला काय उत्तर देतात याची सगळ्यांना प्रतीक्षा आहे.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com