AIMIM News: मालेगाव शहरात राजकीय नेत्यांवरील गोळीबार प्रकरण गेले चार महिने चर्चेत होते. आता या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे. याप्रकरणी एमआयएमचे आमदार मौलाना मुक्ती इस्माईल यांच्या सहकार्यालाच पोलीस कोठडीची हवा खावी लागली.
नोव्हेंबर महिन्यात एमआयएमचे नगरसेवक नदीम फिटर यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली होती याबाबत नगरसेवक फिटर यांनी पोलिसात तक्रार केली होती या तक्रारीनंतर त्यांनी अनेक नेत्यांवर आरोप करीत चर्चेत राहण्याचा प्रयत्न केला होता पोलिसांनी गुन्हेगारांना अटक करावी यासाठी ते सातत्याने मागणी करीत होते याबाबत ते सातत्याने नागरिकांमध्ये चर्चा घडवून आणत असल्याने पोलिसांवरही दबाव निर्माण झाला होता या प्रकरणी दोन संशयतांना पोलिसांनी अटक केली
या प्रकरणात आता एक नवीन ट्विस्ट आला आहे अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या जबाबदावरून पोलिसांनी कारवाई केली आहे यामध्ये थेट फिर्यादी असलेल्या एमआयएमचे माजी नगरसेवक नदीम फिटर यांनाच पोलिसांनी अटक केल्याने खळबळ उडाली आहे
ज्याच्यावर गोळीबार झाल्याची तक्रार झाली त्यालाच अटक करण्याचे हे प्रकरण आहे त्यामुळे मालेगाव शहरात सध्या खळबळ उडाली आहे या प्रकरणात फिर्यादीलाच पोलिसांनी अटक केल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे
संदर्भात नगर माजी नगरसेवक फिटर यांनी चर्चेत राहण्यासाठी आणि आपले प्रतिस्पर्धी माजी आमदार असिफ शेख यांच्या समर्थकांना अडचणीत आणण्यासाठी हा प्रकार केल्याचे बोलले जाते नोव्हेंबर महिन्यात माजी नगरसेवक फिटर यांच्यावर गोळीबार झाला होता हा गोळीबार त्यांनी आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चेत राहण्यासाठी स्वतःच तर घडवून आणला नाही ना अशी चर्चा आता पोलिसांच्या कारवाईने सुरू झाली आहे
या प्रकरणात मालेगाव पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी तिसऱ्या संशय त्यालाही अटक केली होती. त्यातूनच या प्रकरणातील फिर्यादी माजी नगरसेवक आणि आमदार मौलाना इस्माईल यांचे निकटवर्तीय अशी चर्चा असलेल्या नदीम फिटर याला ताब्यात घेतले आहे. त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
त्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी नियोजन करून गोळीबाराचा कट रचण्याचा प्रकार पुढे आला आहे. प्रसिद्धीसाठी राजकीय नेते काय करू शकतात, याचे हे आगळे वेगळे उदाहरण आहे. त्यामुळे पोलिसांना मात्र चार महिने तपासाच्या कामात जुंपून घ्यावे लागले होते.
------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.