लोणी : (Ahemednagar) काँग्रेस (Congress) नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) भावनीक राजकारण करून जनतेला भुलवण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र जनता त्याला भुलणार नाही. महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) उमेदवार पराभूत झाला आहे. काँग्रेस पक्ष त्या आघाडीचा घटक पक्ष आहे. त्या पराभवाची जबाबदारी थोरात स्विकारणार आहे की नाही, असा प्रश्न भाजप नेते, (BJP) महसूल मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील (Dr. Radhakrishna Vikhe-Patil) यांनी केला आहे. (As a leader of Congress Balasaheb Thorat shall take responsiblity of defeat of Congress)
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा राजकीय वाद संपण्याची चिन्हे नाहीत. यासंदर्भात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे परंपरागत विरोधक व महसूल मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत थोरात यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे करीत, टिका केली आहे.
महसूल मंत्री विखे-पाटील म्हणाले, सध्या शासनाची भुमाफीयांच्या विरोधात कारवाई सुरु आहे. या भुमाफीयांच्या प्रश्नासाठी बाळासाहेब थोरात व्हीडीओ कॅान्फ्रसद्वारे बोलू शकतात. त्यावेळी त्यांना कुठलाही आजार आडवा येत नाही. मात्र नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारीच्या प्रचारासाठी ते आजारी असल्याचे कारण सांगतात. आता ते व्यथीत असल्याचे सांगतात. महाविकास आघाडीचा उमेदवार पराभूत झाला म्हणून ते व्यथीत आहेत की, काँग्रेसचा बंडखोर उमेदवार विजयी झाला म्हणून व्यथीत आहेत?. यावर त्यांनी बोललं पाहिजे.
डॉ. राधाकृष्ण विखे पाटील पुढे म्हणाले, मुळ विषयाला बगल देऊन व्यक्तीगत राजकीय अस्मिता जागृत करण्याचा केविलवाणा प्रयत्न श्री. थोरात करीत आहेत. आज संगमनेर तालुक्याच्या राजकारणात मोठ्या ग्रामपंचायती त्यांच्या विरोधात गेल्या आहेत, त्यामुळे ते व्यथीत आहेत का?. जनमानसाचा आधार सुटत चालवला आहे, म्हणून ते व्यथीत आहेत का?. यावर त्यांनी बोललं पाहिजे.
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये तुमची जी दोलायमान आणि दुटप्पी भूमिका होती. एका बाजुला काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते म्हणून मिरवता, मात्र महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी तुम्हाला प्रचार तुम्ही केला नाही आणि करता येत नाही. आज निवडणूक संपल्यावर तुम्ही व्यथीत होऊन बोलायला लागला आहात. जेव्हा निवडणुकीचा प्रचार सुरु होता, तेव्हा महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करण्यापासून कोणी थांबवलं होतं, असा सवाल विखे-पाटील यांनी केला.
विखे पाटील म्हणाले, माझा त्यांना असा प्रश्न आहे की, संगमनेर तालुक्यातील राजकारणातील संघर्ष आणि तालुक्यातील राजकारणाचा विषय पुढे करून भावनीक विषय करीत जनतेला भुलवण्याचा प्रयत्न करत आहात, मात्र जनता भुलनारी नाही. महाविकास आघाडीचा उमेदवार पराभूत झाला आहे, काँग्रेस पक्ष त्या महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे, त्या पराभवाची जबाबदारी थोरात स्विकारणार आहात की नाही, हा गंभीर प्रश्न मला त्यांना विचारायचा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.