Mahayuti Politics: मुक्ताईनगर मतदारसंघाचा वाद; भाजपकडून खडसेंना सेफ पॅसेज मिळेल?

Jalna District Mahayuti Seat Sharing: जळगाव जिल्ह्यातील महायुतीच्या जागा वाटपात रावेर आणि मुक्ताईनगरचा तिढा कायम.
Girish Mahajan, Gulabrao Patil & Anil Patil
Girish Mahajan, Gulabrao Patil & Anil PatilSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon mahayuti news: विधानसभा निवडणुकीचे जागावाटप जवळपास निश्चित झाले आहे. महायुतीने बहुतांशी मतदारसंघात स्थानिक नेत्यांना विश्वासात घेतले. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील जागावाटपाचा प्रश्न सहज सुटला.

अधिकृत घोषणा झाली नसली तरी, प्रस्थापित नेते प्रचाराला लागले आहेत. जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचे जागावाटप जवळपास निश्चित झाले आहे. यामध्ये जळगाव शहर, जामनेर, भुसावळ, चाळीसगाव आणि रावेर हे मतदार संघ भारतीय जनता पक्षाकडे असतील.

शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडे जळगाव ग्रामीण, पाचोरा, एरंडोल, चोपडा आणि मुक्ताईनगर असतील. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला अंमळनेर मतदार संघ देण्यात येणार आहे.

सध्याच्या सूत्रानुसार जळगाव जिल्ह्यात भाजप आणि एकनाथ शिंदे गट हेच मोठे भाऊ ठरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला विद्यमान मंत्री अनिल पाटील प्रतिनिधीत्व करीत असलेला अमळनेर हा एकमेव मतदार संघ सोडण्यात आला आहे. यावर अजित पवार गटाचे स्थानिक नेते कितपत समाधानी राहतील याविषयी साशंकता आहे.

Girish Mahajan, Gulabrao Patil & Anil Patil
Hiraman Khoskar Politics: बडतर्फ आमदार हिरामण खोसकर यांच्या आरोपाने उडाली खळबळ, म्हणाले...

रावेर मतदारसंघात शिरीष चौधरी हे काँग्रेसचे आमदार आहेत. त्यामुळे या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाकडून उमेदवार दिला जातो. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांनी या मतदार संघाची मागणी केली आहे. ती मान्य व्हावी यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

मुक्ताईनगर मतदारसंघातून चंद्रकांत पाटील हे अपक्ष आमदार आहेत. ते पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे आहेत. भाजप शिवसेना युतीमध्ये हा मतदारसंघ भाजपला सोडण्यात आला होता.

या मतदारसंघातून रोहिणी खडसे या भाजपच्या उमेदवार होत्या. त्यांच्या विरोधात बंडखोरी करून चंद्रकांत पाटील अपक्ष आमदार झाले होते. त्यामुळे हा मतदारसंघ नैसर्गिक न्यायाने शिवसेना शिंदे गटाला सोडण्यात आला आहे. असे असले तरीही, रावेर आणि मुक्ताईनगर या दोन मतदारसंघाबाबत महायुतीत अद्याप एकमत झाले नसल्याचे बोलले जाते.

Girish Mahajan, Gulabrao Patil & Anil Patil
Eknath Shinde politics: मुख्यमंत्र्यांची शिवसेना नाशिकमध्ये दोन जागांवरच थांबणार?

जळगाव जिल्हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. येथे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (जामनेर), संजय सावकारे (भुसावळ), सुरेश भोळे (जळगाव शहर), मंगेश चव्हाण (चाळीसगाव), हे विद्यमान आमदार आहेत. हे मतदारसंघ त्या पक्षालाच सोडण्यात आले आहेत.

याच पद्धतीने लताबाई सोनवणे (चोपडा), पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (जळगाव ग्रामीण), चिमणराव पाटील (एरंडोल), किशोर पाटील (पाचोरा) हे शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार आहेत.

त्यांना हे मतदारसंघ सोडण्यात आले आहेत. कोणताही वादविवाद न होता, अथवा वादविवादाला जागाच नसल्याने महायुतीचे हे जागा वाटप झाले आहे. लवकरच महायुतीकडून त्याची अधिकृत घोषणा होईल. त्यामुळे प्रस्थापितांना देखील दिलासा मिळाला आहे. या सर्व प्रस्थापित आमदारांनी आता प्रचाराला सुरुवात केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com