BJP News: भारतीय जनता पक्षाला अनपेक्षित यश मिळाले आहे. निवडणुकीत मिळालेल्या या यशामुळे भाजप नेत्यांची काही प्रमाणात गैरसोय देखील होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता सगळ्यांचे लक्ष भाजपच्या मंत्र्यांची नावे कधी जाहीर होतात, याकडे लागले आहे.
भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी चांदवड मतदार संघात प्रचार सभा घेतली होती. पक्षाचे उमेदवार डॉ राहुल आहेर यांच्या प्रचारासाठी ही सभा होती. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना जाहीरपणे आश्वासन दिले होते. हे आश्वासन आता त्यांच्यासाठी अडचणीचे होण्याची चिन्हे आहेत.
भाजपचे आमदार डॉ आहेर यांनी यंदा हॅट्रिक केली आहे. डॉ आहेर यांना मंत्री करणार, असे आश्वासन दुसऱ्या देण्यात आले होते. मात्र राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे पहिल्या टर्मला भाजप विरोधात बसली त्यानंतर सत्तेत येऊ नाही.
बहुतांशी महत्त्वाची पदे सहकारी पक्षांना द्यावी लागली. त्यामुळे पक्षातील अनेकांना मंत्री आणि अन्य पदांपासून वंचित रहावे लागले होते. त्याचा फटका आमदार डॉ आहेर यांनाही बसला. यंदाच्या निवडणुकीत चांदवड येथे झालेल्या सभेत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी गेल्या वेळेचा शब्द पाळता आला नाही. यंदा मात्र डॉ आहेर यांना निवडून दिल्यास मंत्री करणार अशा आश्वासन दिले होते. यावेळी त्यांनी वीस हजाराच्या आत मताधिक्य असल्यास राज्यमंत्री तर वीस हजाराहून अधिक मताधिक्य असल्यास कॅबिनेट मंत्री करणार, असे आश्वासन दिले होते.
डॉ आहेर यांना एक लाख चार हजार मते मिळाली असून ते अठ्ठेचाळीस हजार ९६१ मताधिक्याने विजयी झाले आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या शब्दांनुसार आमदार डॉ आहेर यांना कॅबिनेट मंत्री करावे लागणार आहे. भारतीय जनता पक्षाला स्वबळावर १३० ऊन अधिक जागा मिळाल्या आहेत.
मंत्रिमंडळ रचनेनुसार सुमारे २१ मंत्री भाजपचे असतील. यामध्ये विद्यमान सर्व मंत्री निवडून आले आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री फडणवीस आपला शब्द पाळणार का हा सध्या चर्चेचा विषय आहे. चांदवड मतदार संघात यावर काहींनी पैजादेखील लावल्या आहेत.
नाशिक जिल्ह्यात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे दादा भुसे हे नाशिकचे पालकमंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे छगन भुजबळ हे कॅबिनेट मंत्री आहेत. हे दोन्ही मंत्री पुन्हा निवडून आले आहेत. अशा स्थितीत भाजप नाशिकला मंत्रीपदासाठी न्याय देऊ शकेल का? हा चर्चेचा विषय आहे. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पहिल्याच मंत्रिमंडळ नेमणुकीत होतो की, त्यासाठी वाट पाहावी लागते याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.