Eknath Shinde : सरोज आहिरे याच महायुतीच्या उमेदवार; मुख्यमंत्री शिंदे यांनी राजश्री अहिरराव यांना सोडले वाऱ्यावर!

Saroj Ahire declared Mahayuti candidate by Shinde: शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऐन निवडणुकीत राजश्री अहिरराव यांचे पंख छाटत आमदार सरोज अहिरे यांना बळ दिले आहे.
Saroj Ahire & Rajshree Ahirrao
Saroj Ahire & Rajshree AhirraoSarkarnama
Published on
Updated on

Deolali Assembly Constituency: शेवटच्या क्षणी करामती करून देवळाली मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाची उमेदवारी राजश्री अहिरराव यांनी मिळवली होती. आता ते त्यांच्या अंगलट आले आहे. शिवसेना शिंदे पक्षाने त्यांना प्रचार शेवटच्या टप्प्यात असतांना अक्षरशः वाऱ्यावर सोडले आहे.

देवळाली मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या विद्यमान आमदार सरोज अहिरे या उमेदवार आहेत. त्या महायुतीच्या उमेदवार म्हणून या मतदारांना सामोरे जात आहेत. मात्र येथे महायुतीच्या उमेदवार म्हणून राजश्री अहिरराव देखील प्रचार करीत होत्या. त्यामुळे महायुतीच्या खऱ्या उमेदवार कोण? असा संभ्रम होता.

Saroj Ahire & Rajshree Ahirrao
Sanjay Raut : राऊत यांचा गौप्यस्फोट: शरद पवारांना सोडणारा पहिला आमदार...

या मतदारसंघात स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या तहसीलदार राजश्री अहिरराव यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेना एकनाथ शिंदे गटाची उमेदवारी देण्यात आली होती. या संदर्भात उपमुख्यमंत्री पवार यांनी हस्तक्षेप केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी धनराज महाले (दिंडोरी) आणि राजश्री अहिरराव (देवळाली) यांना उमेदवारी मागे घेण्याच्या सूचना दिल्या होत्या.

Saroj Ahire & Rajshree Ahirrao
Raj Thackeray : 'मी उद्धव ठाकरेंच्या जागी असतो तर म्हणालो असतो मुख्यमंत्रिपद तुमच्याकडे ठेवा, पण...', राज ठाकरेंनी मनातलं सांगून टाकलं

मात्र श्रीमती अहिरराव यांनी माघार घेतली नव्हती. शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्यांना पाठिंबा दिला होता. आता निवडणुकीचा प्रचार दोन दिवस शिल्लक आहे. असे असताना काल रात्री शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी एक पत्र व्हायरल केले आहे. यामध्ये राजश्री अहिरराव यांना माघार घेण्याची सूचना केली होती.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या आमदार सरोज अहिरे याच महायुतीच्या अधिकृत उमेदवार आहेत. महायुतीमध्ये कोणताही विसंवाद असू नये तसेच या विसंवादाचा फटका महायुतीच्या उमेदवाराला बसू नये म्हणून अहिरराव यांना शिवसेनेच्या कोणत्याही कार्यकर्त्यांनी सहकार्य करू नये, असे पत्रात म्हटले आहे.

हा निर्णय झाल्याने उमेदवार राजश्री अहिरराव यांना मोठा झटका बसला आहे. निवडणुकीत पक्षाने त्यांना वाऱ्यावर सोडण्याचे चित्र आहे. त्यांनी कालपर्यंत प्रचार केला आहे. त्यात शिंदे पक्षाचे काही पदाधिकारी देखील सहभागी होते. आता त्यांना पाठिंबा नसल्याने त्यांच्यापुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व घडामोडींचा मोठा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अहिरे यांना मिळणार आहे.

श्रीमती अहिरराव यांनी आता काहीही भूमिका घेतली तरीही शिवसेना शिंदे पक्षाचे कोणतेही पदाधिकारी त्यांना उघडपणे मदत करू शकत नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा केली आहे. आता हे सर्व पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या आमदार अहिरे यांच्या प्रचारात सक्रिय होणार आहेत.

देवळाली मतदारसंघात शेवटच्या टप्प्यात घडलेल्या नाट्यमय घडामोडींनी हा मतदारसंघ चर्चेचा विषय बनला आहे. सुरुवातीपासून वादाचा विषय असलेल्या श्रीमती अहिरराव यांची अवस्था आता `घर का ना घाट का`अशी झाली आहे. यानिमित्ताने प्रशासकीय अधिकारी म्हणून काम केलेल्या अहिरराव यांना राजकारणाची "खरी" ओळख झाली असावी.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com