Ahmednagar News : लोकसभापेक्षा विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार गटाने चांगलाच जोर लावला आहे. ही विधानसभा निवडणूक त्यांच्या अस्तित्वाची आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक जागावर ते स्वतः लक्ष ठेवून आहेत.
स्थानिक पदाधिकाऱ्यांना देखील अलर्ट राहण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट उमेदवार देणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील भट्टड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
सुनील भट्टड यांनी महायुतीमध्ये शिरूर मतदारसंघाप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) अजित पवार गटाला नगर जिल्ह्यातील राहुरी, नगर, पारनेर, श्रीगोंदा, कोपरगाव, अकोले या जागेवर उमेदवार दिले जाणार आहेत. लोकसभा निवडणुकीत राहुरी मतदार संघात सुजय विखे यांना मताधिक्य मिळाले आहे. अगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाकडून जाहीर झालेला उमेदवार हा हमखास विजयी होईल. महायुती सरकारने आणलेल्या मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेसंदर्भात उप मुख्यमंञी अजित पवार यांचा नगर जिल्हा दौरा असून या दौऱ्यात शरद पवार गटाची अनेक नेतेमंडळी पक्ष प्रवेश करणार असल्याचाही दावा सुनील भट्टड यांनी केला.
महायुती सरकारकडून निधी वाटपात राहुरीवर अन्याय होत असल्याचा आरोप राहुरीच्या लोक प्रतिनिधींकडून झाला होता. माञ राहुरी हे अजित पवारांचे (Ajit Pawar) आजोळ असल्याने विकास कामासाठी मोठ्या निधीची लवकरच तरतूद केली जाणार आहे. तालुक्याचे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या राहुरी शहरात तसेच राहुरी मतदार संघात सरकारच्या निधीतून होणारी कामे निकृष्ट दर्जाची असताना राहुरीच्या लोक प्रतिनिधींकडून ठेकेदारांकडे होणारे दुर्लक्ष दुदैवी आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राहुरीसाठी मिळणाऱ्या निधीतील कामे दर्जेदार होतील, ही खबरदारी घेतली जाणार आहे. गेल्या सात वर्षाच्या कालावधीत राहुरी शहरातील रस्त्याची अवस्था दयनीय झाली असल्याने रस्ता मजबुतीकरण कामासाठी 50 कोटी रूपयांचा निधी मिळावा ही मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राहुरी राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आलेली आहे.
7 वर्षापासून झालेला नगर परिषदेचा कारभार देखील जनते समोर येणे गरजेचे आहे. राहुरी ग्रामीण रुग्णालय जागेचा वाद न्याय प्रविष्ठ असल्याने न्यायालयात केसचा निपटारा होत नाही, तोपर्यंत राहुरीत ग्रामीण रुग्णालय होण्याचा प्रश्न सुटणार नाही. हा प्रश्न न्याय प्रविष्ठ असताना माञ राहुरीत ग्रामीण रुग्णालय होण्याची मागणी करणाऱ्यांकडून आरोग्य मंत्र्याला चुकीची माहिती दिली गेल्याचे सुनील भट्टड यांनी म्हटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष भाऊसाहेब ढोकणे आणि नीलेश शिरसाठ उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.