माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांचे साकडे: ‘अवकाळी’पासून शेतकऱ्यांना वाचवा

‘कोरोना’ची परिस्थिती परिस्थिती सुधारत असताना अवकाळी पावसाने सर्वांच्या आशेवर पाणी फिरविले.
Dr Satish Patil, Ex Minister
Dr Satish Patil, Ex MinisterSarkarnama
Published on
Updated on

पारोळा : ‘कोरोना’ची परिस्थिती परिस्थिती सुधारत असताना अवकाळी पावसाने सर्वांच्या आशेवर पाणी फिरविले असून, ग्रामदैवत अवकाळीपासून शेतकऱ्यांना वाचवा व माझ्या मतदारसंघात सर्वांचे आरोग्य निरामय ठेवा, असे साकडे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील (Ex minister Satish Patil) यांनी श्री बालाजी महाराजांना घातले.

Dr Satish Patil, Ex Minister
एकनाथ खडसेंच्या कुटुंबात महाभारताचा पहिला अध्याय लवकर सुरु झाला!

सुमारे साडेतीनशे ते चारशे वर्षांची परंपरा असलेल्या येथील बालाजी संस्थानच्या वतीने शनिवारी (ता. १६) बालाजी रथाचे पूजन करून बालाजी मंदिरापासून पाच पाऊले रथ ओढण्यात आला. या वेळी डॉ. पाटील यांनी सपत्नीक श्री बालाजी महाराजांचे पूजन केले. या वेळी पंचायत समितीच्या माजी सभापती रेखा पाटील, जिल्हा परिषद सदस्य रोहन पाटील, वर्षा पाटील व बालाजी महाराजांचे विश्वस्त उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा देखील बालाजी रथोत्सवाची मिरवणूक रद्द करण्यात आली.

Dr Satish Patil, Ex Minister
ड्रायपोर्टच्या टायटल क्लीअर जमीनीसाठी राज्य सरकारचा विलंब का?

माजी मंत्री डॉ. पाटील म्हणाले, की कोरोनाच्या पहिला लाटेत संपूर्ण जळगाव जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत होती. मात्र, ग्रामदैवत बालाजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने तब्बल दोन महिन्यानंतर शहरात एक रुग्ण सापडला. प्रतितिरुपती पुण्य पावन नगरी म्हणून पारोळ्याचा लौकिक आहे आणि पुरातन व धार्मिक इतिहासाचा शहराला मोठा वारसा आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून सर्वत्र कोरोनाच्या सावटाखाली जनजीवन सुरू आहे. यंदा खरीप हंगाम चांगला येईल, या आशेने शेतकऱ्यांनी जमिनीत पैसा ओतला. जमिनीची मशागत केली. लहान पिकांना मोठे केले. मात्र, गुलाबी वादळ, अतिवृष्टी व अवकाळी पावसानेमुळे एरंडोल, पारोळा व भडगाव यासह जिल्ह्यातील पिके पाण्याखाली आली. हाती आलेला शेतकऱ्यांचा घास अवकाळी पावसाने हिरावला. शेतात आहे ते पीक दिसेना आणि मजूर मिळेना, अशी द्विधा परिस्थिती शेतकऱ्यांपुढे आली आहे. त्यामुळे अवकाळीपासून शेतकऱ्यांना वाचवा, त्यांची दिवाळी गोड करा, अशी विनंती डॉ. पाटील यांनी बालाजी महाराजांना केली.

दरम्यान, बालाजी मंदिर संस्थान विश्वस्तांच्या पुढाकाराने बालाजी रथाचे पूजन करून शासनाच्या नियमानुसार रथ पूर्णपणे मार्गक्रमण न करता रथचौकात गोल फिरून परत जागेवर स्थानापन्न करण्यात आला.

या वेळी श्री बालाजी महाराजांचे विश्वस्त श्रीकांत शिंपी यांनी सपत्नीक बालाजी महाराजांची विधिवत पूजा केली. तदनंतर विश्वस्तांनी पूजा विधी करीत श्री बालाजी महाराजांचा जयघोष केला. या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्री बालाजी महाराजांची पूजा करून आपले संकल्प केलेत.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com