Vikhe Patil News: लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी नकारात्मक नॅरेटिव्ह सेट केले असा बचाव भाजप सातत्याने करीत आला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप सावध पावले टाकत आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाची बैठक नाशिकला झाली. या बैठकीतही महसूल मंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीचीच जास्त चर्चा केली. निकालावरून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना कान पिचक्याही दिल्या. यातून त्यांनी 'महाविकास आघाडी सत्तेत आल्यास महायुतीच्या सर्व कल्याणकारी योजना बंद करेल' हे नॅरेटिव्ह सेट केले.
आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालामुळे महायुती धास्तावलेली आहे. त्यामुळे ते चांगलीच धावपळ करीत आहेत. विशेषतः भाजपने याबाबत बैठकांचा धडाका लावला आहे.
कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी भाजपचे नेते झटत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पुणे येथे झालेल्या पक्षाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "विरोधकांना ठोकून काढा" असा संदेश दिला. त्यावर भिन्न प्रतिक्रीया उमटल्या आहेत.
नाशिक येथे शनिवारी झालेल्या बैठकीतही आगामी निवडणुकांना कसे सामोरे जावे, यावरच मंथन झाले. त्यात महसूल मंत्री विखे पाटील यांनी विरोधक अपप्रचार करीत असताना भाजपचे कार्यकर्ते शांत बसून होते. त्यामुळे लोकसभेत पक्षाच्या पराभवाला हातभार लागला, असे सांगितले.
विधानसभा निव़णुकीत हे चित्र पूर्णपणे बदलून टाकायचे निर्देश त्यांनी दिले. भाजप आणि महायुती सरकारने ज्या ज्या योजना जाहीर केल्यात त्याचे फलक गावागावात लावण्याच्या सूचना त्यांनी केल्या. लोकांशी चर्चा करावी. त्यांना महायुती सरकारविषयी काय वाटते? हे समजून घ्यावे.
मराठा आरक्षण हा सध्या सर्वाधिक चर्चेचा विषय आहे. या प्रश्नावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांना महायुती सरकारचा अडचणीत आणण्याचा प्रयत्न आहे. तोच धागा पकडून विधानसभेतही भाजप त्यावरच अधिक प्रचार करणार असे संकेत या बैठकीतून मिळाले.
आगामी निवडणुकीत प्रामुख्याने शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना टार्गेट केले जाण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी राज्यात सत्तांतर होणार या आत्मविश्वासाने कामाला लागली आहे. त्याला भाजपकडून आक्रमक उत्तर दिले जाण्याचे संकेत आहेत.
राज्यात सत्तांतराच्या दिशेने कामाला लागलेल्या महाविकास आघाडीला घेरण्याची तयारी सुरू आहे. महाविकास आघाडी सत्तेत आल्यास लाडकी बहीण पासून तर सर्वच कल्याणकारी योजना बंद करील. अशी धास्ती मतदारांमध्ये निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने हे नॅरेटिव्ह सेट केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला त्याला कसे उत्तर द्यावे याचे विचार मंथन करावे लागणार आहे. भाजप नेते महसूल मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीतील नाशिक येथील बैठक त्यामुळेच महत्त्वाची आहे.
आता राज्यभर अशा बैठकांचा धडाका सुरू होणार आहे. त्यात शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटही बाह्या सरसावून कामाला लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.