Maratha Reservation: मराठा आंदोलनाचा 'लालपरी'नेही घेतला धसका; नगर एसटी मंडळाच्या बीड, धाराशिवच्या फेऱ्या रद्द

Maratha Aarakshan : मराठा आरक्षणाचे आंदोलन सोमवारपासून आणखी तीव्र होण्याची शक्यता, एसटी महामंडळ सावध
Maratha Reservation
Maratha ReservationSarkarnama
Published on
Updated on

प्रदीप पेंढारे :

Ahmednagar News: कोणत्याही आंदोलनात सर्वात अगोदर टार्गेट होते, ती एसटी महामंडळाची बस! मराठा आरक्षणाची झळ एसटी महामंडळाने बसू लागली आहे. यामुळे एसटी महामंडळ सावध झाले आहे. सोमवारपासून मराठा आरक्षणाचे आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे एसटी महामंडळाचे सर्व विभाग जिल्हा पोलीस प्रमुखांच्या संपर्कात असून, फेऱ्यांचे नियोजन करत असल्याची माहिती समोर आली आहे. बीड आणि धाराशिवकडे नगरमधून जाणाऱ्या बसेसच्या फेऱ्या पुढील सूचनांपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.

मराठा आरक्षणासाठी मराठा समाज आंदोलक राज्यात आक्रमक झाले आहेत. राज्यकर्त्यांना मराठा आंदोलक जाब विचारू लागले आहेत. ठिकठिकाणी साखळी उपोषण सुरू आहे. राजकीय नेत्यांना गावबंदी केली आहे. मराठा महिला देखील आंदोलनात उतरल्या आहेत. यवतमाळ जिल्ह्यात एसटी महामंडळाची बस रविवारी सकाळी पेटवली गेली. याचबरोबर बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ या जिल्ह्यात बस गाड्यांना टार्गेट केले जात आहे.

Maratha Reservation
Radhakrishna Vikhe Patil: मंत्री विखेंनाही मराठा आंदोलनाचा तडाखा; घोषणाबाजीला जावे लागले सामोरे

यामुळे नगर विभागातील बीड आणि धाराशिवकडे जाणाऱ्या बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. बीड आणि धाराशिव जिल्ह्याच्या पोलीस प्रमुखांनी नगर विभागाला पुढील सूचना येईपर्यंत बस फेऱ्या सुरू न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे नगर विभागाच्या बस गाड्या आज दिवसभरात सुमारे 3 हजार 800 किलोमीटरने कमी धावल्याची नोंद झाली आहे. या बस गाड्या रद्द झाल्याने जामखेड आणि आष्टी तालुक्यामधील प्रवाशांचे हाल झाले.

मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा सोमवारचा दिवस महत्त्वाचा आहे. या दिवशी आंदोलनाची पुढची दिशा ठरणार आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या उपसमितीची बैठक बोलवली आहे. या बैठकीत काय निर्णय होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यात मराठा आरक्षणाच्या पुढच्या आंदोलनाच्या दिशेवर मनोज जरांगे पाटील काय निर्णय घेतात, याकडे देखील लक्ष लागले आहे. जरांगे पाटील यांच्या निर्णयावर सकल मराठा समाज काय प्रतिक्रिया देईल, हे सांगता येत नाही. त्यामुळे एसटी महामंडळाचे राज्यातील सर्व विभागप्रमुख बसच्या फेऱ्यासंदर्भात नियोजन करत आहे. याशिवाय ते पोलीस प्रशासनाच्या संपर्कात असल्याची माहिती आहे.

Edited By- Ganesh Thombare

Maratha Reservation
Sunil Tatkare News : मराठा आरक्षणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरेंचं मोठं विधान, म्हणाले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com