Tomato producers agitation : मी रस्त्याने जात असताना कोणतेही आंदोलन झालेले नाही. कांदे किंवा टोमॅटो रस्त्यावर फेकलेले नाहीत. त्यामुळे उगीच काहीही चर्चा पसरवू नका, या शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले. (Dy. CM Ajit Pawar says, there are no agitation in Nashik against me)
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) नाशिक (Nashik) दौऱ्यावर असताना टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी (Farmers) त्यांच्या विरोधात आंदोलन केले होते. त्याबाबत पवार यांना विचारले असता, त्यांनी त्याचा इन्कार केला.
उपमुख्यमंत्री पवार काल नाशिकच्या दौऱ्यावर होते. ते कळवणला जात असताना वणी परिसरात काही शेतकऱ्यांनी त्यांच्या विरोधात घोषणा देत आंदोलन केले. पवार यांच्या वाहनांचा ताफा जात असताना शेतकऱ्यांनी त्या मार्गावर कांदे आणि टोमॅटो ओतले होते का?. याबाबत पत्रकारांनी त्यांना प्रश्न केला.
पवार यांनी या घटनेचा इन्कार करीत, असे काहीही आंदोलन झालेले नाही. कांदे तर अजिबातच फेकले नाहीत. मात्र, माझी गाडी जात असताना टोमॅटोचा एक क्रेट रस्त्यावर ओतला.
ते म्हणाले, मला पोलिसांनी माहिती दिली की असे करणारे केवळ तीन कार्यकर्ते होते. ते आमच्या पूर्वाश्रमीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे होते. शेतकरी हा आमचा ‘बेस’ आहे, शहरी भागासाठीदेखील आम्ही काम केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मी व्यक्तीशः संवेदनशील असल्याचे ते म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.