Police Recruitment in State: राज्य शासन १८,३११ पोलीसांची भरती करणार

Dy. CM Devendra Fadanvis announced police recruitment in State - मुंबई पोलीस दलात दहा हजार पोलीस कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याचे चित्र.
Devendra Fadanvis
Devendra FadanvisSarkarnama

Police Recruitment News : मुंबई पोलीस दलात दहा हजार पोलीस शिपायांचा तुटवडा असल्याने मनुष्यबळ कमतरता आहे. मुंबई सारख्या शहरात अशी कमतरता योग्य नाही. त्यामुळे राज्यात १८,३११ पोलीस कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. (A large number of police posts have been found vacant in the state)

महाराष्ट्र (Maharashtra) पोलीस (Police) दलातील रिक्त पदांविषयी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आज याबाबत विधान परिषदेत घोषणा केली. त्याचे सदस्यांनी स्वागत केले.

Devendra Fadanvis
Monsoon Session News: तुम्ही दयावान, मी दयावान, सीएम त्यापेक्षाही दयावान!

विधानपरिषदेतील पोलीसांच्या प्रश्नांबाबत झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने आज दुपारी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी या विषयावर निवेदन केले. ते म्हणाले, मुंबई पोलीस दलात दरवर्षी दीड हजार पोलीस निवृत्त होतात. कोविड कालावधीत पाचशे पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे सुमारे दहा हजार पदे रिक्त आहेत. त्यात १४, ५९६ पोलीस तसेच २१७४ चालकांची पदे आहेत. त्यामुळे राज्य शासनाने याबाबतचा निर्णय घेतला.

या अनुषंगाने तातडीने तीन हजार कर्मचारी केंद्रीय, राज्य सरकारी संस्थांच्या सुरक्षा रक्षक (गार्ड) व सुरक्षा, तत्सम कामांसाठी महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक मंडळाकडून तीन हजार सुरक्षा रक्षक तत्पुरती व्यवस्था म्हणून उपलब्ध केले जातील. यात कुठेही कंत्राटी कर्मचारी नियुक्त केले जाणार नाहीत. त्यांना पोलीसांचे व कायदेशीर काम दिले जाणार नाही, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Devendra Fadanvis
Mumbai-Nashik Traffic : विधीमंडळात चर्चा...आज झाली दुप्पट वाहतूक कोंडी!

श्री. फडणवीस म्हणाले, सुरक्षा मंडळाची कर्मचारी दीड तो दोन वर्षे कालावधीसाठी असतील. १४ जुलै २०२३ अन्वये झालेल्या निर्णयानुसार किमान ११ महिने असा कालावधी ठरलेला आहेत. नव्या भरतीतून मुंबई पोलीसांसाठी ७०७६ पोलीस आणि ९९४ चालक उपलब्ध होतील.

यावेळी भाई जगताप, अनिल परब, शशिकांत शिंदे, जयंत पाटील आदी सदस्यांनी उपप्रश्न विचारले. अनिल परब यांनी यातून कंत्राटी कामगार नियुक्त करण्याची प्रथा पडू शकेल. त्यामुळे अलिकडच्या काळात निवृत्त झालेल्या व शारीरीकदृष्ट्या तंदुरूस्त असतील अशा पोलीस कर्मचाऱ्यांच्या नियक्तीचा विचार केला जावा, अशी सूचना केली. त्याबाबत शासन ही बाब तपासून पाहील असे फडणवीस म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com