शिक्षणाधिकारी म्हणाले, `या विभागात आहे हे सांगताना लाज वाटते!`

शिक्षण विभाग बदनाम झाल्‍याची खंत व्यक्त केली.
Education dy director Bhausaheb Chavan

Education dy director Bhausaheb Chavan

sarkarnama

Published on
Updated on

नाशिक : पवित्र मानल्‍या जाणाऱ्या शिक्षण क्षेत्रात काम करत आहे. परंतु, नाशिक विभाग (Nashik) बदनाम झाला असून, या विभागात काम करत असल्‍याचे सांगताना लाज वाटते, अशी खंत शिक्षण (Education) उपसंचालक डॉ. भाऊसाहेब चव्‍हाण (Dr Bhausaheb Chavan) यांनी व्‍यक्‍त केली. आता विभागाची परिस्थिती बदलायची असून, पुढील काळात शिक्षकांनी त्यांच्या कामासाठी चिरीमिरी देण्याची आवश्यकता राहणार नाही, असे आश्‍वासन त्यांनी केले.

<div class="paragraphs"><p>Education dy director Bhausaheb Chavan</p></div>
धुळ्याची शिवसेना प्रतिमा अन् अंतर्गत वादात रूतली!

मुख्याध्यापक संघातर्फे सोमवारी झालेल्‍या क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात झालेल्‍या सहविचार सभेत ते बोलत होते. सभेच्‍या अध्यक्षस्‍थानी पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे होते. शिक्षण उपसंचालक श्री. चव्‍हाण म्‍हणाले, की अनेक वर्षांपासून विनाअनुदानित तत्त्वावर कार्यरत २९९ शिक्षकांचे शालार्थ आयडीचे प्रस्ताव रखडलेले आहेत.

<div class="paragraphs"><p>Education dy director Bhausaheb Chavan</p></div>
शिवसेना म्हणते, धुळे शहरातही मालमत्ता कर माफ करा!

जलदगतीने हे प्रस्‍ताव मार्गी लावण्याचा प्रयत्‍न असेल. शिक्षण विभागात बोगस स्वाक्षरी घेणे, स्वाक्षरी स्कॅनिंग करून वापरणे, असे गैरप्रकार घडणे दुदैवी आहे. अनेक वर्षांपासून पवित्र पोर्टल कार्यरत असतानाही शिक्षक भरती सुरू आहे. मागील तारखांची कामे यापुढे करणार नसल्याचा इशारादेखील त्‍यांनी दिला. कर्मचाऱ्यांनी वर्कशीट वापरणे, मेडिकल बिले निकाली काढण्यासाठी ‘फिफो’ चा वापर करण्याबाबतचे आदेश त्‍यांनी या वेळी दिले. पुढील सभेपूर्वी शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या स्तरावरील प्रकरणे निकाली काढण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. सहविचार सभेप्रसंगी वेतन पथक अधीक्षक उदय देवरे, माध्यमिक शिक्षण विभागाचे अधीक्षक सुधीर पगार, ए. आर. बागूल यांनी उपस्‍थित शिक्षकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.

शासनाचे मार्गदर्शन मागविले

दरम्‍यान, तुकाराम सुपे याला अटक झाल्‍यामुळे नाशिक शिक्षण विभागातील शालार्थ आयडीचे प्रस्‍ताव पाठविण्याबाबत अडचण उद्भवत असल्‍याचे अशी विचारणा करण्यात आली. यास उत्तर देताना राज्य शासनाचे मार्गदर्शन मागविल्याचे शिक्षण उपसंचालक श्री. चव्हाण यांनी नमूद केले.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com