शिवसेना म्हणते, धुळे शहरातही मालमत्ता कर माफ करा!

करमाफीचा विषय शासनाकडून मंजुरीसाठी शिवसेना मदत करणार.
Shiv Sena Demands House Tax Concession in Dhule

Shiv Sena Demands House Tax Concession in Dhule

Sarkarnama

धुळे : मुंबई (Mumbai) महापालिकेच्या धर्तीवर धुळे (Dhule) महापालिकेनेही पाचशे चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करावा, अशी मागणी शिवसेनेने (Shivsena) महापालिका आयुक्तांकडे केली. करमाफीचा हा विषय शासनाकडून मंजुरीसाठी शिवसेना मदत करेल, असेही शिवसेनेने म्हटले आहे. (Shiv Sena Demands House Tax Concession in Dhule)

<div class="paragraphs"><p>Shiv Sena Demands House Tax Concession in Dhule</p></div>
धुळ्याची शिवसेना प्रतिमा अन् अंतर्गत वादात रूतली!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईकरांना मालमत्ता करमाफीचा दिलेला शब्द पाळला. मुंबई महापालिकेने पाचशे चौरसफूट घरांना मालमत्ता करमाफीचा अत्यंत योग्य व सर्वसाधारण नागरिकांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.

धुळे महापालिकेनेही असेच चांगले काम करून नागरिकांना दिलासा दिला पाहिजे. कोरोनाच्या नैसर्गिक आपत्तीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले आहे. विविध साथीच्या आजारांमुळेही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे धुळे महापालिकेने पाचशे चौरसफुटांपर्यंत क्षेत्रफळ असलेल्या घरांना करमाफीचा निर्णय घेतल्यास तो दिलासा देणारा निर्णय ठरेल. सध्या महापालिकेकडून बेकायदा पद्धतीने मालमत्ता मोजणीचे काम होत आहे. गेल्या तीन वर्षांत नागरिकांना मनपाने काहीही नागरी सुविधा पुरविलेल्या नाहीत. ३६५ दिवसांची पाणीपट्टी घेऊन वर्षाला ६५ दिवसदेखील पाणीपुरवठा करत नाही. शहराची स्वच्छता सध्या तर दुर्मिळच झालेली आहे.

<div class="paragraphs"><p>Shiv Sena Demands House Tax Concession in Dhule</p></div>
राज्यमंत्री भारती पवार आणि खासदार हेमंत गोडसे विकासासाठी एकत्र!

मनपाच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे महापालिकेला नागरिकांकडून कोणताही कर घेण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नाही. त्यामुळे नागरिकांना दिलासा देणारा करमाफीचा निर्णय घ्यावा, त्यासाठी हा विषय महासभेत घेऊन मंजुरीसाठी शासनाकडे पाठवावा.

या चांगल्या कामात शिवसेना आपल्यासोबत राहून शासनाकडून हा विषय तत्काळ मंजूर करण्यासाठी मदत करेल, असे शिवसेनेने म्हटले आहे. मागणीचे निवेदन महापौर प्रदीप कर्पे, आयुक्त देवीदास टेकाळे यांना दिले. शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख महेश मिस्तरी, जिल्हाप्रमुख डॉ. तुळशीराम गावित, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, महानगरप्रमुख मनोज मोरे, सतीश महाले, धीरज पाटील, डॉ. सुशील महाजन, राजेश पटवारी, गुलाब माळी यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी मागणीचे निवेदन दिले.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com