Eknath Khadse : 'भाजपचा प्रचार करा' एकनाथ खडसेंना शरद पवारांचा आदेश, संधी मिळताच मंगेश चव्हाणांनी काढला चिमटा

Mangesh Chavan On Eknath Khadse Statement : राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार करताना एकनाथ खडसेंनी भाजपला मतदान करा असे आवाहन केले. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे.

Sharad Pawar, Eknath Khadse, Mangesh Chavan
Sharad Pawar, Eknath Khadse, Mangesh ChavanSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra politics : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून भुसावळ येथे उमेदवारांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी प्रचार करताना खडसेंनी भाजपला मतदान करा असे आवाहन केल्याचं दिसून आलं. हे एकुन उपस्थितीत सगळेच गोंधळल्याचे पाहायला मिळाले.

एकनाथ खडसेंनी बोलताना, भाजपला मतदान करा असे आवाहन केल्याचा व्हिडिओ समोर आला. येणाऱ्या दोन तारखेला प्रत्येक मत कमळाच्या फुलाला असलं पाहिजे असं खडसे म्हणाले. तेवढ्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ त्यांना तुतारीची आठवण करून दिल्यानंतर खडसे यांनी चूक दुरुस्त करत 'तुतारीलाच मतदान करा' असं सांगितलं.

त्यानंतर आपल्या चुकीवर खडसेंनी तत्काळ स्पष्टीकरण दिलं. अनेक वर्ष आपण भाजपमध्ये काम केलं असल्याने कमळाचा उल्लेख केला गेल्याचं ते म्हणाले. मात्र एकनाथ खडसे यांच्या भाजपला मतदान करा, या वक्तव्याचे भांडवल भाजप नेत्यांनी केलं आहे.


Sharad Pawar, Eknath Khadse, Mangesh Chavan
Girish Mahajan Politics : दादा भुसेंच्या सुसाट राजकारणाला गिरीश महाजनांनी लावला ब्रेक, दुसरा कट्टर विरोधकही भाजपमध्ये घेतला

भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी यावरुन खडसेंना खोचक टोला लगावला आहे. शरद पवार साहेबांनीच त्यांना भाजपचा प्रचार करा म्हणून सांगितले असावे असा टोला मंगेश चव्हाण यांनी लगावला. एकनाथ खडसे जर बिन बुलाया मेहमानाप्रमाणे आमचा प्रचार करत असतील आणि त्यामुळे भाजपची संघटन वाढत असेल, तर आम्हाला काही हरकत नाही. शरद पवार यांनीच त्यांना आमदारकी दिली, ते मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होते, पण आज ते भाजपचं नाव घेत आहेत. शरद पवार साहेबांनीच त्यांना भाजपचा प्रचार करा असा आदेश दिला असावा असा चिमटा मंगेश चव्हाण यांनी काढला.


Sharad Pawar, Eknath Khadse, Mangesh Chavan
Manikrao Kokate : भाजपने घर फोडलं…अखेर मंत्री कोकाटेंना संताप अनावर, बाटलेला पक्ष अन् काय काय म्हणाले?

दरम्यान मुक्ताईनगर नगरपालिका निवडणुकीत तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने उमेदवारच दिलेला नाही. खडसे यांनी तिथे राष्ट्रवादीचा उमेदवार 'सक्षम नाही' तसेच राष्ट्रवादीची ताकद नाही असेही म्हटले होते. खडसे यांनी आपल्या सुन केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांना फायदा मिळवून देण्यासाठीच माघार घेतल्याचा आरोप त्यांच्यावर अनेकांनी केला. आता भुसावळमध्ये त्यांनी भाजपला मतदान करा असे आवाहन केल्याने खडसेंना नक्की विस्मरण झाले की यातही काही राजकारण आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com