Eknath Khadse : एकनाथ खडसेंमुळे भाजपसमोर मोठं आव्हान, कट्टर विरोधकासोबत केली हात मिळवणी!

Bhusawal municipal election : भुसावळच्या राजकारणात खडसे आणि चौधरी एकत्र आल्याने भाजपसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. मंत्री संजय सावकारे हे भुसावळ शहराचे आहेत. त्यामुळे या नगरपालिकेवर सत्ता राखणे हा मंत्री सावकारे यांच्यासाठी राजकीय प्रतिष्ठेचा विषय आहे.
Eknath Khadse
Eknath Khadse and Santosh Chaudhary sharing a rare stage in Bhusawal signals a major political shift. Their unexpected alliance intensifies the BJP challenge in the region.Sarkarnama
Published on
Updated on

Bhusawal News, 15 Nov : भुसावळ शहरावरील भाजपचे वर्चस्व नगरपालिका निवडणुकीत कायम राखण्याचे आव्हान आहे. माजी मंत्री एकनाथ खडसेंनी यासाठी मोठा राजकीय डाव टाकला आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

भुसावळ नगरपालिकेत भाजप युतीचे रमण भोळे माजी नगराध्यक्ष होते. गेल्या निवडणुकीत त्यांना माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे पाठबळ होते. त्या जोरावर त्यांनी गेली पाच वर्ष कारभार हाकला. यंदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने जोरदार मोर्चे बांधणी केली आहे.

मात्र, राजकीय स्थिती उलटी झाली आहे. यंदा खडसे भाजप विरोधात उभे ठाकले आहेत. भुसावळ नगरपालिका ताब्यात ठेवण्यासाठी भाजपने मोठी फौज मैदानात उतरवली आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी त्यासाठी नेत्यांना मोठी रसद उपलब्ध केली आहे. डबल इंजिन सरकार हा त्यांचा मुख्य प्रचार आहे.

Eknath Khadse
Srinagar blast : देश पुन्हा हादरला! श्रीनगरमध्ये दिल्लीपेक्षाही मोठा स्फोट; 9 जणांचा मृत्यू तर 29 जण जखमी, नेमकं काय घडलं?

या पार्श्वभूमीवर आपल्या विरोधकांना आव्हान देण्यासाठी खडसेंनी गेली अनेक वर्ष जोपासलेले राजकीय वैर बाजूला ठेवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संतोष चौधरी हे खडसेंचे कट्टर विरोधक. एकाच पक्षात असूनही या दोन्ही नेत्यांमध्ये मोठा वाद आहे.

भुसावळ नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री खडसे यांनी एक पाऊल मागे घेतले आहे. त्यांनी आपल्या कट्टर विरोधक संतोष चौधरी यांच्याशी हात मिळवणे केली आहे. त्यामुळे भुसावळच्या राजकारणात मोठे फेरबदल झालेत. गेल्या आठवड्यात खडसे आणि चौधरी एकच व्यासपीठावर आले.

Eknath Khadse
Bihar Election Results : उशीरा बिहारचे चित्र स्पष्ट, नितीश कुमार-भाजपमध्ये फक्त चार जागांचे अंतर; मुख्यमंत्रिपदी सम्राट चौधरी?

यावेळी त्यांनी नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने कार्यकर्त्यांना आवाहन केले. दोन्ही नेत्यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भुसावळच्या राजकारणात खडसे आणि चौधरी एकत्र आल्याने भाजपसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. मंत्री संजय सावकारे हे भुसावळ शहराचे आहेत. त्यामुळे या नगरपालिकेवर सत्ता राखणे हा मंत्री सावकारे यांच्यासाठी राजकीय प्रतिष्ठेचा विषय आहे.

एकनाथ खडसे आणि संतोष चौधरी यांची हात मिळवणे मंत्री सावकारे यांच्यासाठी डोकेदुखी ठरण्याचे चिन्ह आहेत. त्या दृष्टीने मंत्री सावकारी यांनीही खडसे समर्थकांना मधाचे बोट लावण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. खडसे आणि चौधरी हे नेते एकत्र आले, मात्र त्यांच्या समर्थकांना हा निर्णय पचनी पडणार का? याचे उत्तर निवडणूक निकालातूनच पुढे येईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com