

Nowgam Blast 15 Nov : दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्थानकाजवळ झालेल्या बॉम्बस्फोटाच्या जखमा ताज्या असातानाच शुक्रवारी (ता.14) रात्री पुन्हा एकदा मोठ्या स्फोटाने देश हादरला आहे.
श्रीनगरच्या नौगाम पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या स्फोटामध्ये 9 जणांचा मृत्यू तर 29 जण जखमी झाल्याची माहिती आहे. या स्फोटाची तीव्रता दिल्लीतील स्फोटापेक्षा जास्त असल्याचं सांगितलं जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीनगरमधील नौगाम पोलीस स्टेशनमध्ये काल रात्री दिल्लीत स्फोट झाल्यानंतर तपास यंत्रणांनी या स्फोटाशी निगडित दहशतवादी मॉड्यूल उध्वस्त करण्यासाठी देशभरात अनेक ठिकाणी धाडी टाकल्या होत्या.
याच मॉड्यूलशी संबंधित जप्त करण्यात आलेली स्फोटके नौगाम पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आली होती. या स्फोटकांची तपासणी करत असताना हा स्फोट झाल्याचं सांगितलं जात आहे. फॉरेन्सिक टीम, तहसीलदार आणि पोलीस कर्मचारी स्फोटके हाताळत असताना त्याचा स्फोट झाल्यामुळे या घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला.
स्फोटानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं की, स्फोट झालेल्या अमोनियम नायट्रेटचा साठा हा हरियाणातील फरिदाबाद येथून आणण्यात आले होते. अटकेत असलेला दहशतवादी डॉ. मुझम्मिल गनई यांच्या भाड्याच्या घरातून जप्त केलेल्या 360 किलोग्रॅम स्फोटक रसायनांचा भाग होता.
जप्त केलेले अमोनियम नायट्रेट पोलीस स्टेशनच्या आवारात साठवले होते या स्फोटकाचा फॉरेन्सिक टीम जप्त केलेल्या अमोनियम नायट्रेटची चाचणी घेण्यात येत होती. योवेळीच अमोनियम नायट्रेटमुळेच हा स्फोट झाला. ही संपूर्ण घटना पोलीस स्टेशनजवळच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
तर या स्फोटाचा आवाज 30 किमीपर्यंत ऐकू गेल्याचं सांगितलं जात आहे. तर स्फोटानंतर पोलीस स्टेशनच्या परिसरातील अनेक वाहनांना आग लागली होती. रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केलं असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.