Eknath Khadse News : 'शासन आपल्या दारी' उपक्रमावरील खर्चावरुन खडसेंचा सरकारला टोला, म्हणाले...

Maharashtra Politics : '' त्यामुळे सरकारने शासन आपल्या दारी उपक्रम राबविण्याऐवजी...''
Eknath Khadse Latest News
Eknath Khadse Latest NewsSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon : राज्यात शिंदे- फडणवीस- पवार सरकारचा 'शासन आपल्या दारी' हा उपक्रम धुमधडाक्यात सुरु आहे. आत्तापर्यंत अनेक ठिकाणी हा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडत आहे. पण आता याच उपक्रमावरुन माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी सरकारवर निशाणा साधला.

एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकारच्या शासन आपल्या दारी या उपक्रमावर भाष्य केले. खडसे म्हणाले, राज्यात शासन आपल्या दारी योजनेसाठी खर्च केला जात आहे,मात्र तेवढ्याच खर्चात राज्यात कृत्रिम पाऊस पाडून दुष्काळी परिस्थितीवर मात करता येईल असे मतही त्यांनी व्यक्त केले.

Eknath Khadse Latest News
Rupali Chakankar News : राखी पौर्णिमेला 'महिला धोरणा'ची बहिणींना भेट ! रुपाली चाकणकरांचे संकेत

खडसे म्हणाले, आज पावसाअभावी अनेक भागात दुष्काळी स्थिती निर्माण होण्याच्या शक्यता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले,आपण मंत्री असताना राज्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग राबविला होता,तो यशस्वीही झाला होता. आज राज्यात अनेक भागात पाऊस नसल्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे,त्यामुळे कृत्रिम पाऊस पडण्याची गरज आहे असेही ते म्हणाले.

आज राज्यातील सरकार राज्यभरात शासन आपल्या दारी उपक्रम राबवित आहे,त्याला जो काही खर्च येत आहे. तेवढ्याच खर्चात कृत्रिम पाऊस पडू शकतो. त्यामुळे सरकारने शासन आपल्या दारी उपक्रम राबविण्याऐवजी कृत्रिम पाऊस पाडावा असा सल्लाही खडसेंनी दिला.

Eknath Khadse Latest News
Jitendra Awhad - Bhujbal News : '' तो अदृश्य हात कुणाचा...समझनेवाले को...''; भुजबळांची 'ती' टीका, आव्हाडांचं सूचक ट्विट

राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवारांसह काही नेते सत्ताधारी पक्षात गेल्याबद्दल ते म्हणाले अजित पवार यांच्यासोबत नेते गेले आहेत,कार्यकर्ते,आणि जनता शरद पवारांच्या सोबत आहे, आमच्याकडे सत्ता आल्यास हे सर्व पुन्हा परत येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com