Amshya Padvi & Dr Vijaykumar Gavit
Amshya Padvi & Dr Vijaykumar GavitSarkarnama

Eknath Shinde Politics: एकनाथ शिंदेंच्या आमदारावर भाजपचा थेट हल्ला, गंभीर आरोपांनी आमदार आमश्या पाडवींच्या अडचणीत भर?

Dr Vijaykumar Gavit; Eknath Shinde's MLA Pratap, 14 houses in the name of the MLA and his wife -आमदार आमश्या पाडवी आणि पत्नीच्या नावे तब्बल १४ घेर असल्याचा गंभीर आरोप माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केला.
Published on

Amshya Padvi News: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पक्षाचे आमदार आमश्या पाडवी चांगलेच अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. त्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या घरकुलाचा लाभ घेतला आहे. याबाबत भाजपने त्यांच्यावर गंभीर आरोप करीत थेट तक्रार दाखल केली आहे.

शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे आमदार आमश्या पाडवी सातत्याने चर्चेत असतात. आता ते एका नव्या प्रकरणामुळे गोत्यात येण्याची चिन्हे आहेत. यावेळी त्यांना सत्ताधारी भाजपच्या नेत्यांनीच घेरले आहे. या संदर्भात थेट तक्रार देखील करण्यात आल्याने नंदुरबारचे राजकारण पुन्हा एकदा तापले आहे.

https://sarkarnama.esakal.com/maharashtra/uttar-maharashtra/uddhav-thakrey-communication-is-enthusiastic-due-to-alliance-between-mns-and-shiv-sena-workers-of-nashik-sd67भाजप नेते आणि माजी मंत्री डॉ विजयकुमार गावित यांनी याबाबत गंभीर आरोप केला आहे. आमदार आमश्या पाडवी आणि त्यांच्या पत्नीकडे १४ खाजगी घरे आहेत. असे असताना आमदार पाडवी यांचा मुलगा आणि पत्नीने केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेतून घर मिळवले आहे. एवढ्यावरच न थांबता राज्य शासनाच्या शबरी घरकुल योजनेतून देखील घरकुलाचा लाभ घेतला आहे.

Amshya Padvi & Dr Vijaykumar Gavit
Reunion of Thackeray's: उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आल्याने नाशिक महापालिकेत मॅजिक घडेल काय?

आमदार आमश्या पाडवी यांचे गृहक्षेत्र असलेल्या अक्कलकुवा येथे डॉ गावित यांनी भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात त्यांनी महायुतीचा सहकारी पक्ष असलेल्या शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या प्रतिस्पर्ध्यांना चांगलेच फैलावर घेतले. भाजपाच्या विकासाच्या योजनांच्या आड येणाऱ्यांना सोडले जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

यावेळी त्यांनी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि आमश्या पाडवी हे आपल्या टार्गेटवर आहेत असे सांगितले. आगामी काळात त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची आहे गैरप्रकार करणे हे आमच्या विरोधकांचे नेहमीचे काम आहे. त्यामुळे विविध चौकशीच्या जाळ्यात ते अडकले आहेत. त्यांच्या अडचणी वाढतील.

या पार्श्वभूमीवर शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे नेते आमदार रघुवंशी यांनीही गावित यांना जशास तसे उत्तर दिले आहे. आदिवासी विकास विभागात सर्वाधिक भ्रष्टाचार करणारा देशातील एकमेव मंत्री म्हणून डॉ गावित यांचा उल्लेख होतो. आदिवासींच्या योजनांचा व्यक्तिगत लाभ आणि गैरकारभार त्यांनी केला आहे. एवढे महापाप करूनही ते नाम निराळे राहू पाहत आहेत. खोट्या तक्रारी करून ते आमचे काय वाकडे करतील?, असे आमदार गावित यांनी उत्तर दिले आहे.

--------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com